जळगाव ACB चे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
गौरवकुमार पाटील / अमळनेर
खिरोदा ता रावेर येथील शेतजमिनीवर मयत पतीच्या निधनानंतर पत्नी व मुलाला वारस लावण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच घेताना तलाठी प्रमोद प्रल्हाद न्हायदे , वय-४५ वर्ष, तलाठी, सजा खिरोदा व कोतवाल शांताराम यादव कोळी , वय-५२ वर्ष यास जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकाने कारवाई करत रंगेहाथ पकडून सावदा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे ,
याबाबत सविस्तर वृत्त असेंकी खिरोदा ,ता.रावेर येथील ६३ वर्षीय तक्रारदार पुरुषाने भाऊ मयत झाल्याने मयताची पत्नी व मुलास भावाच्या शेतजमीनिवर वारस लावण्यासाठी तलाठी खिरोदा तलाठी कार्यालयात सर्व पुरावे व कागदपत्रे सादर केली मात्र वारस नोंद लावण्यासाठी ४ हजार रुपये लाचेची मागणी केली , तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या कार्यालयात तक्रार नोंदवली त्यानुसार आज दिनांक ६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ठेवला होता त्यात प्रमोद प्रल्हाद न्हायदे , वय-४५ वर्ष, तलाठी, सजा खिरोदा तलाठी कार्यालय ता.रावेर जि.जळगाव. (वर्ग-३) रा. गणेश कॉलनी, फैजपुर ता.यावल जि.जळगाव. शांताराम यादव कोळी , वय-५२ वर्ष, कोतवाल, सजा खिरोदा तलाठी कार्यालय ता.रावेर जि.जळगाव. (वर्ग-४)रा.खिरोदा, ता.यावल जि.जळगाव. हे दोन्ही अडकले आणि त्यांच्यावर सावदा ता रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

यातील तक्रारदार यांची वडीलोपार्जीत शेती खिरोदा तलाठी कार्यालयाचे हद्दीमध्ये आहे. तक्रारदार यांचे मोठे भाऊ मयत झालेले असल्याने सदर शेत जमीनीचे ७/१२ उताऱ्यावर मयत भावाची पत्नी व मुलगा यांचे नावे वारस म्हणून नोंद घेण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष आलोसे क्रं.१ व २ यांनी ४,०००/रु.लाचेची मागणी लाचेची मागणी केली. सदर मागणी केलेली लाच रक्कम आलोसे क्रं.१ यांनी आलोसे क्रं.२ यांच्या उपस्थितीत पंचासमक्ष स्वतः सजा खिरोदा तलाठी कार्यालय खिरोदा येथे स्वीकारली. म्हणून दोन्ही आरोपीतांविरुद्ध सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

यांच्या पथकाने केली सापळा कारवाईसाठी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,
अप्पर पोलीस अधीक्षक,
नाशिक एन.एस.न्याहळदे परिक्षेत्र, नाशिक. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार ,जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
सापळा व तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक एस.के.बच्छाव यांच्या सापळा पथकातपो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने. यांना कारवाई मदत म्हणून
स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर आदींनी परिश्रम घेतले
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






