Why mangoes should be soaked in water before consuming आंबे खाऊन तब्येत बिघडते कारण.. आंबा खाताना होणारी चूक..
शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात फळ आणि भाज्यांचा समावेश करणे आवश्यक. सिझननुसार फळ आणि भाज्या खाल्ल्याने शरीराला आवश्यक पौष्टीक घटक मिळतात. ज्यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा अवयवांना मिळते. सिझनला मिळणारे सगळे फळ, भाज्या खाण्याचा सल्ला अनेक जण देतात. सध्या उन्हाळा सुरु आहे.
उन्हाळ्यात आंबा मोठ्या प्रमाणावर मिळतात. आंब्याला फळांचा राजा देखील म्हणतात. आंबा खाण्याचे शौकीन संपूर्ण महाराष्ट्रात सापडतील. पण आंबा आवडतो म्हणून जास्त खाऊ नका. आंबा अधिक खाल्ल्याने देखील आरोग्यावर दुष्परिणाम होतात. ज्यामुळे हाडं ढिसूळ होण्याची शक्यता वाढते.
यासंदर्भात, पोषणतज्ञ किरण कुकरेजा सांगतात, ”आंब्याच्या आत फायटिक अॅसिड असते. हे घटक शरीरासाठी फायदेशीर पण आहे, व तितकेच हानिकारक देखील आहे. आंब्याव्यतिरिक्त अनेक बिया व धान्यांमध्ये हे आढळते. याच्या अतिरिक्त सेवनाने शरीरात ३ गोष्टींची कमतरता भासू शकते”
आंबा खाण्याची योग्य पद्धत

पोषणतज्ञांच्या मते, आंबे खाण्यापूर्वी किमान १ तास पाण्यात भिजवले पाहिजेत. जेव्हा आपण आंबा पाण्यात भिजवतो, तेव्हा फायटिक ऍसिड कमी होते, व शरीरात होणाऱ्या संभाव्य नुकसानांपासूनही संरक्षण होते.
या आजारांपासून करेल सरंक्षण

एनसीबीआयच्या संशोधानुसार, फायटिक ऍसिड शरीरात गेल्यानंतर लोह, जस्त आणि कॅल्शियम इत्यादींचे शोषण कमी करते. ज्यामुळे शरीराला हे घटक मिळत नाही. अशा स्थितीत अशक्तपणा, कमकुवत हाडे आणि झिंकची कमतरता होऊ शकते.
भिजवलेले आंबे खाल्ल्याने वाढणार नाही उष्णता

काही लोकांचे शरीराचे तापमान जास्त असते. थोडासा आंबा खाल्ल्यानंतरही पिंपल्स, अॅलर्जी, स्किन इन्फेक्शन ही समस्य उद्भवू लागते. पोषणतज्ञांच्या मते, भिजवलेले आंबे खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढत नाही.
फायटिक ऍसिड ठरते फायदेशीर

काही संशोधनात असे आढळून आले की, फायटिक ऍसिड संतुलित मात्रामध्ये अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. ज्यामुळे इन्शुलिन रेजिस्टेंसपासून बचाव होतो व मधुमेहाचा धोका काही प्रमाणात टाळता येतो.
हे वाचलंत का ?
- Viral Video: एका १८ वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला; स्थानिकांच्या मदतीने वाचला जीव पहा अंगाच्या थरकाप होईल असा व्हिडिओ.
- बिबट्या पतीच्या नरडीचा घोट घेणार, तोच पत्नी आली रणरागिणी बनून बिबट्याशी एक तास झुंज देऊन पतीचे वाचविले प्राण, सर्वत्र कौतुक.
- संतापजनक;रक्षकच बनला भक्षक! महिलादिनानिमित्त सत्काराला बोलावून पोलिस कर्मचाऱ्यानेच केला महिलेवर बलात्कार, नागरिकांमध्ये संताप.
- एका व्यक्तीने त्याच्या दोन प्रेयसींसोबत मिळून तिसऱ्या प्रेयसीची केली हत्या; काय आहे प्रकरण व पोलिसांनी आरोपीच्या शोध कसा लावला, वाचा संपूर्ण बातमी.
- छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी मंत्री गुलाबराव पाटील यांचे अभिवादन; संभाजी महाराजांचे बलिदान म्हणजे राष्ट्रप्रेमाचा सर्वोच्च आदर्श – मंत्री गुलाबराव पाटील