छत्रपती संभाजीनगर : कंपनीत नाईट शिप्टचे काम आटोपून घरी परतताना तरूणाचा दुर्देवी मृत्यू झाला. रेल्वे लाईन क्राॅस करत असताना कानात इअरफोन लावले होते.यामुळे रेल्वे येत असल्याने तरूणाच्या लक्षात आले नाही. यात रेल्वेची जोरदार धडक बसल्याने तरूणाचा चिरडून मृत्यू झाला.
रेल्वे रूळ ओलांडणे हा मुळात गुन्हा आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून देखील वारंवार आवाहन केले जात असते. तरी देखील बेफिकीरपणाने रेल्वे रूळ ओलांडत असतात. यात अनेकजण तर कानात इअरफोन लावून बोलत किंवा गाणे ऐकत जात असतात. अशात रेल्वे रूळ क्राॅस करताना डावी- उजवीकडे न पहाता सरळ क्राॅसिंग करत असतात. यामुळे अपघात झाल्याच्या घटना देखील अनेकदा घडल्या आहेत. अशीच घटना आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील मुकूंदवाडी भागात घडली.
घरी जाताना मृत्यूने गाठले-
आज सकाळच्या सुमारास मुकुंदवादी भागातील घटना घडली. रमेश लक्ष्मण गुंड (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. रमेश हा रात्रपाळी करून कंपनीतून सकाळी घरी जात होता. या दरम्यान त्याने कानात इअरफोन घालून रेल्वे पटरी ओलांडत असताना दुर्घटना घडली. याबाबत मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे देखील वाचा
- गुणगौरव समारंभामुळे गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षकांना प्रोत्साहन आमदार मा.अमोलदादा पाटील
- मारुती मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात असलेल्या दोघांना डंपरची जोरदार धडक,दुचाकीस्वार तरुण ठार तर मित्र गंभीर जखमी.
- एरंडोल येथे वैफल्यग्रस्त ३८ वर्षीय युवकाची गळफास घेवून संपविले जीवन.
- मोयखेडा दिगरला घरकुल नाही तर कुळघर/ घरकुल योजनेचा फज्जा; गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून सुद्धा समितीचा चौकशीकडे कानाडोळा.
- प्रवीण गायकवाडांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन