64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक अडकला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात, न्यूड व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देत उकळली खंडणी

Spread the love

पुणे : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात न्यूड व्हिडिओ बनवून अनेक नागरिकांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार घडत आहेत अशीच एक घटना आहे ती पुण्यातील एका ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला सेक्सटॉर्शनच्या (Sextortion) जाळ्यात ओढून तब्बल पावणे पाच लाखांची खंडणी उकळली. या ज्येष्ठ नागरिकाला न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले.

पुण्यातील एका ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला सेक्सटॉर्शनच्या (Sextortion) जाळ्यात ओढून तब्बल पावणे पाच लाखांची खंडणी उकळली. या ज्येष्ठ नागरिकाला न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले. त्यांना प्रथम न्यूड व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडले होते. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात ६४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.
ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईल धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २१ ते २३ मार्च या कालावधीत हा प्रकार घडला आहे. तक्रारदारांना तरुणीच्या नावाने संपर्क साधण्यात आला होता. या तरुणीने त्यांच्याशी चॅटिंग केले व व्हिडिओ कॉल देखील केला. पण, त्यांना एक नग्न व्हिडिओ दाखवत त्यांनाही नग्न होण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याचे रेकॉर्डिंग करून घेतले. हे रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळले.

त्यानंतर त्यांना यातील काही आरोपींनी आम्ही पोलीस असून, युट्यूबवरून हा व्हिडिओ डिलिट करण्यासाठी चार्जेस द्यावे लागतील असे म्हणून पैसे उकळले. आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाकडून ४ लाख ६६ हजार रुपये उकळले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान असे न्यूड व्हिडिओ काॅल आले तर स्वीकारू नका असे आव्हान पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार