वसई : – सध्या देशात सोशल मीडिया वर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढत असताना एका वृद्ध प्रवाशांचा पाय घसरल्यामुळे प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्यामध्ये अडकले. मात्र त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर असलेल्या रेल्वे पोलिसाने सतर्कता दाखवत वृद्ध प्रवाशाला खेचून बाहेर काढले आणि त्यांचे प्राण वाचवले. ही घटना स्थानकात लागल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
नालासोपारा येथे राहणारे विजय वसंतराव मळेकर हे ७६ वर्षीय वृद्ध वसई रोड रेल्वे स्थानकात लोकल ट्रेन पकडण्यासाठी आले होते. बुधवार रात्री ११ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास विरारला जाणारी जलद लोकल वसई रोड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर आली. त्यानंतर ही लोकल रवाना होत असताना विजय मळेकर यांनी धावत्या लोकलमध्ये चढून लोकल पकडण्याचा प्रयत्न केला.
रेल्वे पोलिसाने दाखवली समयसूचकता
धावत्या लोकलचा वेग वाढल्याने विजय मळेकर यांचा पाय घसरला आणि ते रेल्वे प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधल्या पोकळीत खाली पडत असतानाच त्याठिकाणी असलेल्या लोहमार्ग पोलिस कॉन्स्टेबल यांनी समयसूचकता दाखवली. प्रवासांच्या मदतीने रेल्वे प्लॅटफॉर्म आणि पोकळीत पडत असलेल्या प्रवाशाला खेचून बाजूला सारले व मळेकर यांचे प्राण वाचवले. रेल्वे स्थानकात घडलेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पहा व्हिडिओ :
रेल्वे पोलिसाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका वृद्ध प्रवाशाचे प्राण वाचले आहेत, यामुळे रेल्वे पोलिसांचे कौतुक होत आहे. विजय माळेकर यांना त्यानंतर सुखरूप घरी सोडण्यात आले, आपल्या घरातील व्यक्तीचे प्राण वाचवल्याबद्दल मळेकर कुटुंबीयांनी देखील पोलिसांचे आभार मानले आहेत.
हे वाचलंत का ?
- लग्न होत नाही म्हणून एजेंटला दिले 5 लाख रुपये, सोन दिल लग्न लागलं अन् दुसऱ्याच दिवशी नवरी फरार, 5 जणांन विरोधात गुन्हा दाखल.
- उसनवार दिलेले अडीच लाख रुपये दे, किंवा माझ्याशी लग्न कर असा तगादा लावणाऱ्या महिलेच्या मित्रांने केली हत्या.
- जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरास केले जेरबंद; साडे सात लाखांच्या 15 मोटरसायकली जप्त
- आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रा.वसंत हंकारे यांच्या एरंडोल येथील व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद
- पारोळा बायपास महामार्गावर गॅसचा टँकर कलंडला:.…..प्रशासनाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला…..