जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
स्मरण शक्तीला ताण द्यावा लागेल. फार हटवादीपणा करू नका. आपले मत उत्तमरित्या मांडाल. टीकेला सामोरे जाऊ लागू शकते. कलेला पोषक वातावरण लाभू शकते.
वृषभ :-
सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. आपले योग्य व विचारी मत शांतपणे मांडाल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. नवीन मित्र जोडले जातील. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल.
मिथुन :-
दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. चारचौघांत तुमच्या शब्दाला मान मिळेल. व्यवसायात वाढ करता येईल. व्यापार्यांना चांगला आर्थिक लाभ होईल. बढतीसाठी प्रयत्न करावेत.
कर्क :-
तुमच्या स्वभावावर खुश होतील. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. आर्थिक मिळकत सुधारेल. मनाची चंचलता जाणवेल. जोडीदाराचे मत ग्राह्य मानावे लागेल.
सिंह :-
उष्णतेच्या तक्रारी जाणवतील. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे. खाण्यापिण्याचे पथ्य पाळावे. अधिक उर्जेने कामे कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
कन्या :-
मुलांची काळजी लागून राहील. स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी. सट्टा-जुगारा पासून दूर राहावे. उपासनेला अधिक वेळ देता येईल. पारमार्थिक मदत कराल.
तूळ :-
जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा लागेल. घरगुती प्रश्न चर्चेने हाताळा. दिवसभर कार्यरत राहाल.
वृश्चिक :-
कानाच्या विकारांची काळजी घ्यावी. योग्य चलाखी दाखवून कामे कराल. भावंडांची मतभेद संभवतात. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
धनू :-
लहरीपणाने वागू नये. बोलताना सारासार विचार करावा. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा. कामातील तांत्रिक ज्ञान गोळा करावे. कष्टाला घाबरू नका.
मकर :-
डोकेदुखीचा त्रास जाणवेल. अधिकाराचा उत्तम वापर करता येईल. मागचा पुढचा विचार करून निर्णय घ्यावेत. कामाच्या ठिकाणी अनपेक्षित बदल दिसून येतील. आपलेच म्हणणे खरे कराल.
कुंभ :-
दूरच्या प्रवासाचे योग येतील. अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे. सौंदर्य प्रसाधने खरेदी केली जातील. मुलांच्या आनंदात रमून जाल. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो.
मीन :-
मित्रांशी होणारे गैरसमज टाळावेत. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. एककल्ली विचार करू नका. बोलण्यातून तुमचे चातुर्य दाखवाल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






