पहुर ( जामनेर ) : सध्या महाराष्ट्रात प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचे घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील एक गावात घटना समोर आली आहे.अल्पवयीन मुलगी आणि तरुणामध्ये प्रेमसंबंध होते. मुलीच्या नातेवाईकांना प्रेमसंबंधाबाबत माहिती पडल्याने मुलीने तरुणाला प्रेमसंबंधास नकार दिला. तेव्हा तरुणाने अल्पवयीन मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. वारंवारच्या या धमकीच्या भितीने १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात समोर आली आहे. घटनेच्या अकरा दिवसानंतर याप्रकरणी मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी २३ वर्षीय तरुणाविरोधात शुक्रवारी सायंकाळी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह वास्तव्यास होती. काही दिवसांपूर्वी मुलीची २३ वर्षीय तरुणासोबत ओळखी झाली. या ओळखीतून दोघांमध्ये प्रेमाचे सूत जुळले. एकेदिवशी मुलगी तरुणासोबत फोनवर बोलत असताना नातेवाईकांना हा प्रकार लक्षात आला. नातेवाईकांनी मुलीला विश्वासात घेवून नेमका प्रकार काय आहे, याबाबत विचारले असता, मुलीचे तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. मुलगी ही अल्पवयीन असल्याने तसेच गावात बदनामी होईल म्हणून नातेवाईकांनी मुलीची समजूत घातली, त्यानंतर मुलगी आणि तरुणामधील प्रेमसंबंध तुटले.
‘माझ्या सोबतचे तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन’
नातेवाईक तसेच कुटुंबियांना प्रकार माहिती पडल्यानंतर मुलीने तरुणास प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. मात्र, यानंतर तरुण हा प्रेमसंबंध ठेवण्यासाठी मुलीला आग्रह करत होता. प्रेमसंबंध तोडले तर माझ्यासोबतचे तुझे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करेन, अशी धमकीही संशयित तरुण मुलीला वारंवार देत होता. तरुणाकडून धमकी देत वारंवारचा त्रास आणि बदनामीच्या भितीने २९ मार्च रोजी मुलीने गळफास घेवून आत्महत्या केली होती.
याप्रकरणी सुरुवातीला पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीअंती, अकरा दिवसानंतर शुक्रवारी सायंकाळी याप्रकरणी तरुणाविरोधात पहूर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






