नांदेड :- येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिल्यामुळे प्रेमीयुगुलांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील दर्याबाई उमरी या गावात ही घटना घडली आहे. अंजली थोरात आणि आकाश वाठोरै अशी मृत तरुण आणि तरुणीचे नाव आहे.
दोघांनी एकत्र विष प्राशन करून विष प्राशन करुन आपली जीवन यात्रा संपवली आहे. अधिक माहिती अशी की, मयत अंजली थोरात आणि आकाश वाठोरै यांचे प्रेम संबंध होते. अंजली ही मूळची अर्धापूर तालुक्यातील पांगरी या गावाची रहिवाशी होती. तिच्या आईचा मृत्यू झाल्याने ती आजोळी ऊमरी दर्या येथे मामाकडेच राहत होती.
याच गावातील आकाश वाठोरे ह्याच्यासोबत तिची मैत्री झाली. पुढे चालून मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही शिक्षणासाठी हदगावला ये-जा करीत होते.दोघांमध्ये 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
अंजलीच्या कुटुंबाला दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती कळाली. तिच्या वडिलांनी आणि आजोबानी या संबंधाला नकार दिला. त्यानंतर अंजलीचे लग्न नात्यातील मुलासोबत लावून देण्यात आलं. लग्न झाल्यानंतरही आकाश आणि अंजलीमध्ये संवाद सुरू होता.
28 मार्च रोजी मुलगी नांदेडला आली होती. तेव्हा तिला आकाशने गाडीवर गावी आणले. पण ही माहिती आजोबाला समजली आणि त्यानी दोघांवर राग काढला. पुढे देखील आपल्या संबंधाला मान्यता मिळणार नसल्याने दोघांनी 30 मार्च रोजी विषप्राशन केले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवला उशिरा प्राप्त झाल्याने आज मनाठा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
हे देखील वाचा
- Viral Video: एका १८ वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला; स्थानिकांच्या मदतीने वाचला जीव पहा अंगाच्या थरकाप होईल असा व्हिडिओ.
- बिबट्या पतीच्या नरडीचा घोट घेणार, तोच पत्नी आली रणरागिणी बनून बिबट्याशी एक तास झुंज देऊन पतीचे वाचविले प्राण, सर्वत्र कौतुक.
- संतापजनक;रक्षकच बनला भक्षक! महिलादिनानिमित्त सत्काराला बोलावून पोलिस कर्मचाऱ्यानेच केला महिलेवर बलात्कार, नागरिकांमध्ये संताप.
- एका व्यक्तीने त्याच्या दोन प्रेयसींसोबत मिळून तिसऱ्या प्रेयसीची केली हत्या; काय आहे प्रकरण व पोलिसांनी आरोपीच्या शोध कसा लावला, वाचा संपूर्ण बातमी.
- छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी मंत्री गुलाबराव पाटील यांचे अभिवादन; संभाजी महाराजांचे बलिदान म्हणजे राष्ट्रप्रेमाचा सर्वोच्च आदर्श – मंत्री गुलाबराव पाटील