खिर्डी बु!येथे शांतता कमिटी ची बैठक संपन्न..

Spread the love

सामाजिक व जातीय सलोखा राखून सण उत्सव साजरे करावे -एपीआय गणेश धुमाळ

निंभोरा प्रतिनिधी -परमानंद शेलोडे

रावेर :- आज दि 9 रविवार रोजी सकाळी 10 वा. खिर्डी बु. येथील ग्रामपंचायत कार्यालयात निंभोरा पोलीस प्रशासनाच्या वतीने आगामी सण, उत्सव पाहता शांतता कमिटी ची बैठक आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी सामाजिक व जातीय सलोखा राखून तसेच कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावणार नाही व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.त्याचबरोबर सोशल नेटवर्कद्वारे पसरविल्या जाणाऱ्या अफ़वा मॅसेज, व्हिडीओ याची शहानिशा केल्या शिवाय फॉरवर्ड करू नये. तसेच काही आशेपार्ह आढल्यास या संदर्भात पोलिसांना माहिती द्यावी व अफ़वावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन निंभोरा पो.स्टे.सपोनि. गणेश धुमाळ यांनी केले.


सदर बैठकीला श्री कृष्ण मंदिर संस्थान चे मठाधीपती प्रदीपजी महाराज , डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष
माजी सरपंच महेंद्र कोचुरे, उपाध्यक्ष योगेश जाधव, सदस्य विनायक जहुरे, अल्ताफ बेग, अंकुश जाधव,ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोळी,रेम्भोटा येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष कांतीलाल गाढे, रामा कोचुरे , गफुर कोळी, विनोद जाधव, प्रविण जाधव, सचिन जाधव,गावातिल सर्व पत्रकार बंधू व प्रतिष्ठित व्यक्ती या बैठकीला उपस्थित होते. खिर्डी खुर्द चे पोलीस पाटील प्रदीप पाटील यांनी हि आवर्जून या बैठकीला उपस्थिती दर्शवली.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार