जालना:- शेतकऱ्याच्या घराला आग लागून दीड लाखांच्या नोटा जळाल्याची घटना घडली आहे. घराला लागलेली ही आग एवढी भीषण होती की त्यात या शेतकऱ्याची दुचाकी, सोने, धान्य आणि घरातील सर्व साहित्यांसह संपूर्ण संसार जळून खाक झाला.गोकुळ बमनावत असे या नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव येते शेतवस्तीवर गोकुळ बमनावत हे शेतकरी त्यांच्या कुटुंबासह राहतात. सोमवारी ते शेतात काम करत असताना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागली.
घराला आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी त्याच्या मदतीला धावले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. अखेर या आगीत त्यांचा संपूर्ण संसार जळून खाक झाला.
या आगीत त्यांनी घरात ठेवलेल्या दीड लाख रुपयांच्या नोटा देखील जळून खाक झाल्या. एवढंच नाही तर आग लागली त्यावेळी घरात असलेला 25 क्विंटल कापूस, एक दुचाकी आणि तीन लाखाचं सोनं देखील जळून खाक झालं. याशिवाय 15 क्विंटल गहू, 10 क्विंटल ज्वारी आणि घरातली इतर सर्व साहित्य देखील या आगीत भस्मसात झालं.
गोकुळ बमनावत यांनी काही दिवसांपूर्वी तूर विकून आलेले पैसे बँकेत जमा केले होते. आता पुन्हा या वर्षी जोमाने शेती करण्यासाठी ते विहिरीत बोर घेणार होते. त्याचं काम देखील सुरु झालं होतं. त्यासाठी त्यांनी बँकेतून दीड लाख रुपये काढून आणले होते. परंतु या दुर्दैवी घटनेमुळे त्यांचे ते पैसे देखील जळून खाक झाले.
गेल्या वर्षभरापासून केलेली मेहनत एका क्षणात जळून खाक झाल्याने बमनावत यांच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडलं आहे.या आगीत गोकुळ बमनावत यांच जवळपास 10 ते 12 लाख रुपयांचं नुकासान झालं आहे. त्यामुळे या शेतकऱ्याच्या जळालेल्या संसाराचा शासनाने पंचनामा करून तात्काळ मदत करावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.
हे देखील वाचा
- Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
- रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण
- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांच्या खून करणाऱ्या आई व तिच्या प्रियकरास जन्मठेप.
- “माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला” असे माझ्या शवपेटीवर लिहा ही माझी शेवटची इच्छा आहे अशी सुसाईट नोट लिहून तरुणाने केली आत्महत्या.
- एक तरुण नोकरी गेल्याने निराश होऊन कंटाळून आपल्या देशात येण्यासाठी निघाला अचानक त्याच्या नशिबाची बंद कवाडे उघडली अन् तो झाला 13 कोटींचा मालक