Viral Video : इंटरनेटवर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पाण्यावर चालणारी महिला असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.अशातच रस्त्यावर पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या तरुणींचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
मद्यपान करुन गाडी चालवणे हा सर्वात मोठा गुन्हा मानला जातो. मद्यपान करुन गाडी चालवल्याने असंख्य रस्ते अपघात झाले आहेत. मद्यपान करुन गाडी चालवणे हे रस्ते अपघातांचे सर्वात प्रमुख कारण आहे. तरीदेखील अनेक जण या गोष्टीकडे दुर्लक्ष करुन गाडी चालवतात. चेक पोस्टवर वाहतूक पोलिसांना पकडल्यावर हुज्जत घालणाऱ्या तरुण तरुणींचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत.
अन् त्या तरुणींनी चक्क!
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तरुणींचं कृत्य पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये तरुणी पोलिसांशी वाद घालताना दिसत आहे. रस्त्यावरुन जाताना काही कारणामुळे पोलिसांनी त्या तरुणींना थांबवले. मात्र नंतर त्या तरुणी दारुच्या नशेत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
कोल्ड्रिंक्समध्ये त्या तरुणींनी…
झालं असं की, पोलीस आणि एका मुलीचा वाद सुरु आहे. तेवढ्यात दुसरी तरुणी पोलिसांनी वाद घालायला लागते. पोलीस संतापतो आणि त्याचा हातातील कोको कोलाची बाटल हिसकावून घेतो आणि त्याचा वास घेतो. एवढंच नाही तर तो पोलीस त्या बाटलमधील पेयाचा घोट घेता तर त्याला धक्काच बसतो. तो लगेचच ते थुंकून देतो. त्या तरुणींना तो सतत तुम्ही मद्यपान करत आहात असं ऐकवत असतो.
तरुणीने लाच देण्याचा प्रयत्न केला…
तो पोलीस त्या तरुणीना सारख म्हणत असतो, तुम्हाला लाज वाटत नाही, का तुम्ही मुली आहात दारु पीत आहात. तेवढ्यात एक तरुणी गाडीतून पैसे आणते आणि पोलिसांना देण्याचा प्रयत्न करते. हे पाहून तो अजून संतापतो.
ती म्हणाली की, आईशी बोला नाही तर…
पोलिसांशी वाद सुरुच असताना दुसरी तरुणी तिच्या आईला फोन लावते आणि पोलिसांना म्हणते आईशी बोला नाही तर…पोलीस त्या तरुणीच्या हातातून फोन खेचून घेतात पण बोलत नाहीत. हे सगळं सुरु असताना ती एका व्यक्तीला विचारते हे सगळं मोबाईलमध्ये रिकॉड करत आहे की नाही. पहिली तरुणी परत पोलिसांना पैसे देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे पोलिसांचा मनस्ताप वाढतो.तिथे एक तरुणीही असतो, पोलीस त्या तरुणीच्या कानशिलात लगावतो. ही सगळी घटना तिथे असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ ट्वीटरवर @hellwala या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.
हे देखील वाचा
- लग्न होत नाही म्हणून एजेंटला दिले 5 लाख रुपये, सोन दिल लग्न लागलं अन् दुसऱ्याच दिवशी नवरी फरार, 5 जणांन विरोधात गुन्हा दाखल.
- उसनवार दिलेले अडीच लाख रुपये दे, किंवा माझ्याशी लग्न कर असा तगादा लावणाऱ्या महिलेच्या मित्रांने केली हत्या.
- जळगाव एमआयडीसी पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरास केले जेरबंद; साडे सात लाखांच्या 15 मोटरसायकली जप्त
- आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रा.वसंत हंकारे यांच्या एरंडोल येथील व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद
- पारोळा बायपास महामार्गावर गॅसचा टँकर कलंडला:.…..प्रशासनाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला…..