बार्शी :- तालुक्यातील एका गावातील मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिचे आई-वडिल आणि सासू-सासरे यांनी तिचे लग्न लावलं. तीन वर्षांनंतर तिने एका बाळाला जन्मही दिला.मात्र आता ती मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. सोलापूर येथील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्यामुळे मुलीचे आई-वडील, पती, सासू आणि सासरा अशा पाच जणांविरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून सरंक्षण, बालविवाह प्रतिबंधक नियम, महिलांवर अत्याचार आदी कलमांनुसार बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस नामदार शबाना कोतवाल यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर ५ एप्रिल २०२३ रोजी ही घटना उघडकीस आली. मिलालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीचा विवाह १६ एप्रिल २०२० रोजी तिच्या घरासमोर लावून देण्यता आला. लग्नाच्या तीन वर्षांनतंर तिला एक मुलगीही झाली. यानंतर ती पुन्हा सात माहिन्यांची गर्भवती होती. दरम्यान तिला अचानक तीव्र प्रसुती वेदना होऊ लागल्या. त्यामुळे ३ एप्रिल रोजी तिला बार्शीतील येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करुन ४ एप्रिल रोजी सोलापूर येथील दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. सोलापूर येथे तिची आपतकालीन परिस्थितीत प्रसूती करण्यात आली. तिने एका गोड मुलीला जन्ह दिला. परंतु आता तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्या पतीकडे मुलीचे आधारकार्ड मागितले. तेव्हा तिची जन्मतारीख १० जानेवारी २००६ असल्याचा खुलासा झाला. तिला १७ वर्षे पूर्ण होऊन १८ वे वर्षे सुरु असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. दरम्यान अल्पवयीन मुलीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे तपास करीत आहेत.
हे देखील वाचा
- Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
- रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण
- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांच्या खून करणाऱ्या आई व तिच्या प्रियकरास जन्मठेप.
- “माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला” असे माझ्या शवपेटीवर लिहा ही माझी शेवटची इच्छा आहे अशी सुसाईट नोट लिहून तरुणाने केली आत्महत्या.
- एक तरुण नोकरी गेल्याने निराश होऊन कंटाळून आपल्या देशात येण्यासाठी निघाला अचानक त्याच्या नशिबाची बंद कवाडे उघडली अन् तो झाला 13 कोटींचा मालक