Viral Video: मध्य आफ्रिकन देश रिपब्लिक ऑफ कांगो येथून मैत्रीच्या अतुट नात्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही चकीत व्हाल. येथे एक सोन्याची खाण कोसळल्याने अनेक कामगार त्यात अडकले होते.
सुदैवाने सर्वजण बचावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ही घटना काँगोच्या दक्षिण किवू प्रांतात असलेल्या एका खाणीत घडली. येथे काही मजूर सोन्याच्या खाणीत काम करत होते. अचानक ती खाण कोसळू लागली. खाण इतक्या वेगाने कोसळली की, कामगारांना बाहेर पडता आले नाही. मुसळधार पावसानंतर हे भूस्खलन आले होते. यावेळी एका व्यक्तीने आपल्या साथीदारांना वाचवण्यासाठी हाताने माती हटवण्यास सुरुवात केली.
वरुन सतत माती पडत होती आणि हा व्यक्ती हाताने ती माती हटवत होता. यावेळी मातीतून एक एक करत त्याचे साथीदार बाहेर पडत होते. यावेळी खाणीतून एकामागून एक 9 जण बाहेर आले. सुदैवाने त्यातील कोणालाच इजा झाली नाही. दरम्यान, खाणींमध्ये अशा घटना सर्रास घडतात, मात्र यामध्ये मजुरांना जीव गमवावा लागतो. या घटनेत चांगली गोष्ट म्हणजे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






