जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
मनाची चंचलता जाणवेल. बौद्धिक दृष्टिकोन ठेवावा. आपल्याच मतावर आग्रही राहाल. कामातील द्विधावस्था टाळावी. काही बदलांना सामोरे जावे लागेल.
वृषभ :-
इतरांवर तुमची उत्तम छाप पडेल. जुगाराची आवड जोपासाल. काही गोष्टी स्पष्टपणे बोलणे टाळा. चटकन निराश होवू नका. अनाठायी खर्च टाळावा.
मिथुन :-
लहान मुलांशी खेळण्यात रमून जाल. वयस्कर व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. घरातील वातावरण खेळकर राहील. काही गोष्टी जाणून बुजून लपवून ठेवाल. चित्त एकाग्र करावे.
कर्क :-
जवळच्या ठिकाणी जाण्याचा योग येईल. मानसिक शांतता शोधाल. मनाजोगी खरेदी करता येईल. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल.
सिंह :-
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. कामातील अडचणी दूर करता येतील. व्यावसायिक लाभाकडे लक्ष द्याल. वडीलधार्यांचा सल्ला मोलाचा ठरेल. महत्वाकांक्षी दृष्टिकोन बाळगावा.
कन्या :-
आपल्या मर्जीप्रमाणे दिवस घालवाल. काही गोष्टींना उशिरा वाव मिळेल. योग्य संधीची वाट पाहावी. मुलांच्या धडपडीकडे लक्ष द्यावे. पारमार्थिक कामात मदत कराल.
तूळ :-
मानसिक ताणतणाव राहील. पत्नीशी क्षुल्लक कारणांवरून वादविवाद संभवतात. गुंतवणुकीचा नवीन पर्याय विचारात घ्या. नैराश्याला बळी पडू नका. तडजोडीला पर्याय नाही.
वृश्चिक :-
उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. व्यापारी वर्ग खुश राहील. प्रवासात काळजी घ्यावी. हातातील कामात यश येईल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल.
धनू :-
कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वादविवाद सामोपचाराने सोडवावेत. बोलताना शब्द जपून वापरावेत. कामाचा ताण जाणवेल. डोळ्यांची काळजी घ्यावी.
मकर :-
अडथळ्यातून मार्ग काढता येईल. आपलेच म्हणणे खरे कराल. उष्णतेचे विकार संभवतात. शांततेचे धोरण स्वीकारावे. मेहनतीवर भर द्याल.
कुंभ :-
अतीविचार करणे टाळावे. घरगुती सौख्याचा आनंद घ्याल. उत्तम साहित्य वाचनात येईल. भावंडांचा सल्ला घ्याल. तर्कसंगत विचार करावा.
मीन :-
आपले मत ठामपणे मांडाल. कामात प्रगतीला वाव आहे. जमिनीच्या कामातून चांगला फायदा होईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होतील.
हेही वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






