आग्रा :- सोशल मीडियावर सध्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील व्यक्तीच्या कृतीचा अनेकांनी निषेध केला आहे. हो कारण या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारा माणूस काही कागदपत्रांवर मृतदेहाच्या अंगठ्याचा ठसे लावत असल्याचं दिसत आहे.हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी व्हिडीओतील व्यक्तीवर टीका करायला सुरुवात केला आहे. माणूस सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही असं म्हटलं जातं. कारण संपत्तीचा मोह हा एखाद्या व्यक्तीला कोणतही कृत्य करायला भाग पाडतो. व्हायरल व्हिडिओमधील वकीलाने असंच काहीसं कृत्य केल्याचं लोक म्हणत आहेत.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह कारमध्ये पडलेला दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या वेळी एक वकील या मृतदेहाच्या अंगठ्याचे ठसे काही कागदांवर उमटवताना दिसत आहे, तर त्याच्या मागे दोन माणसंही उभे असल्याचंही दिसत आहे. हा व्हिडिओ आग्रा येथील असल्याचे सांगितले जात आहे.
हा व्हिडीओ माजी सपा नेत्या रोली मिश्रा तिवारी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “किळसवाणा प्रकार पाहा, हा व्हिडिओ आग्रा येथील असल्याचं सांगितलं जात आहे, ज्यामध्ये मृत वृद्ध महिलेची मालमत्ता घेण्यासाठी तिच्या मृतदेहाच्या अंगठ्याचे ठसे घेतले जात आहेत. अशा अमानुष लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे.” शिवाय त्यांनी हे ट्वीट यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यूपी पोलीस आणि आग्रा पोलिसांना टॅग केलं आहे.
या व्हिडीओवर आता नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, लज्जास्पद… लोकांची मानसिकता किती खालच्या पातळीवर जाऊ शकते, हेच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तर आणखी एकाने, असले घृणास्पद कृत्य करताना लाज कशी वाटत नाही? हे कोणत्या प्रकारचे लोक आहेत असं लिहिलं आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “हे कृत्य अत्यंत अमानवी असून, मालमत्तेसाठी आणि जमिनीसाठी लोक कोणत्याही टोकाला जाऊ शकतात, त्यांना वृद्धांची कसलीही काळजी वाटत नाही.”
हे देखील वाचा
- Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
- रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण
- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांच्या खून करणाऱ्या आई व तिच्या प्रियकरास जन्मठेप.
- “माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला” असे माझ्या शवपेटीवर लिहा ही माझी शेवटची इच्छा आहे अशी सुसाईट नोट लिहून तरुणाने केली आत्महत्या.
- एक तरुण नोकरी गेल्याने निराश होऊन कंटाळून आपल्या देशात येण्यासाठी निघाला अचानक त्याच्या नशिबाची बंद कवाडे उघडली अन् तो झाला 13 कोटींचा मालक