तीन वर्षांपूर्वी पळून जाऊन विवाह केल्याने आई वडिलांशी सतत वाद होत असल्यामुळे विवाहितेचा दोन चिमुकल्यांसह दुर्दैवी अंत

Spread the love


सांगली : प्रेमविवाह केलेल्या एका महिलेने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उढाली आहे. जत तालुक्यातील सिंदूर या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.पोलिस पुढील तपास करत आहेत. दिव्या धनेश माडग्याळ (वय २३) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिला एक 9 महिन्याचा मुलगा होता. तर एक 2 वर्षांची मुलगी होती. तीन वर्षांपूर्वी पळून जाऊन दिव्याने धनेश माडग्याळसोबत प्रेमविवाह केला होता.

नऊ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह रात्री विहिरीत तरंगताना आढळून आला होता. त्यानंतर रात्री हा मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सोमवारी मायलेकींचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आला आहे. तिघांच्या मृत्यूने खळबळ उढाली आहे. दिव्याने गावातीलच धानेश सिद्दनिंग माडग्याळ या युवकाबरोबर घरातून पळून जाऊन तिने प्रेम विवाह केला होता. सिंदूर गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आढळहाटी रोडवर हे दाम्पत्य स्वतःच्या शेतात राहत होते.

तिला एक मुलगी दिव्या (वय 2) आणि श्रीशैल्य (वय 9 महिने) हा एक मुलगा होता. प्रेम प्रकरणातून पळून जाऊन लग्न केल्यानंतर दिव्याच्या आईवडिलांशी दाम्पत्याचे वाद सुरु होते. या वादातून त्यांचे सारखे खटके उडत होते. यातूनच तिने आत्महत्येचे टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा गावात सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास जत पोलिस करत आहेत.

हे देखील वाचा

टीम झुंजार