जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
गप्पांमध्ये रंगून जाल. व्यावसायिक अधिकार प्राप्त होतील. आर्थिक परिस्थिती सुधारली जाईल. काही गोष्टींचा धूर्तपणे विचार करावा. चौकसपणे गोष्टी जाणून घ्याल.
वृषभ :-
आध्यात्मिक बळ वाढेल. केलेल्या कामाचे कौतुक केले जाईल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. कामातून मनाजोगा आनंद मिळेल. वैचारिक दृष्टीकोन बदलला जाईल.
मिथुन :-
जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. काही गोष्टींचा शांतपणे विचार करावा. काटकसरीने वागाल. मुलांशी खेळण्यात वेळ घालवाल. चांगली संगत लाभेल.
कर्क :-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. घरगुती वापराच्या वस्तू खरेदी केल्या जातील. मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक कामात रमून जाल. किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.
सिंह :-
भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही. भागीदाराशी मतभेद संभवतात. सहकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल. आवडते पुस्तक वाचायला मिळेल.
कन्या :-
घरातील कामे आनंदाने कराल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. पोटाचे किरकोळ आजार संभवतात. जोडीदाराविषयी मतभेद वाढवू नका. स्मरण शक्तीला ताण द्यावा लागेल.
तूळ :-
आपलेच म्हणणे खरे कराल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. जोडीदाराचे तुमच्यावर प्रभुत्व राहील. सहकुटुंब सहलीचा बेत आखाल. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते.
वृश्चिक :-
कौटुंबिक प्रश्नांकडे लक्ष द्यावे. कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा. दिवसभर कार्यरत राहाल. मानसिक चंचलता जाणवेल. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी.
धनू :-
भावंडांशी मतभेद संभवतात. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. व्यापारी वर्ग खुश राहील. स्वभावातील हट्टीपणा कमी करावा. वादविवादात भाग घेऊ नका.
मकर :-
उतावीळपणे कामे करणे टाळावे. खर्च करताना मागचा पुढचा विचार करावा. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. शांत व संयमी विचार करावा.
कुंभ :-
वैयक्तिक स्वातंत्र्य जपावे. नवीन मित्र जोडावेत. उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न कराल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. चांगले वाहन सौख्य लाभेल.
मीन :-
स्त्री वर्गापासून जपून राहावे. कामाची व्याप्ती वाढेल. ओळखीतून कामे मार्गी लागतील. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. अचानक धनलाभ संभवतो.
हेही वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






