Mosambi Juice Benefits: मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता प्राप्त होते. मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे. मोसंबी सौंदर्यवर्धक आहे.
Mosambi Juice Benefits: उन्हाळ्यात गरमीपासून सुटका मिळवण्यासोबत लोक वेगवेगळ्या ज्यूसचं सेवन करतात. डॉक्टरही या दिवसात शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी वेगवेगळे पेय पिण्याचा सल्ला देतात. यात मोसंबीच्या रसाचाही समावेश आहे. केवळ उन्हाळ्यातच नाही तर इतर वेळीही मोसंबीच्या रसाचे अनेक आरोग्यादायी फायदे होतात.
मोसंबीच्या रसाने शरीर थंड राहतं. मोसंबीत ए, बी, सी ही जीवनसत्त्वे आढळतात. विशेषत: मुलांसाठी मोसंबी फायदेशीर आहे. मोसंबी पौष्टिक, पाचक, हृदयासाठी चांगली आणि रक्तसुधारक आहे. सरबतासारखे थंडपेय तयार करण्यासाठी, अन्न पदार्थांना सुगंध आणि स्वाद आणण्यासाठी मोसंबीचा रस वापरतात. मोसंबीचा रस उत्साहवर्धक असल्याने अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांसाठी विशेष उपयुक्त ठरतो.
- पचनक्रिया चांगली राहण्यासाठीही मोसंबीचा रस फायदेशीर आहे. आपल्या सुंगधाने आणि अॅसिडमुळे मोसंबीचा रस पचनक्रिया चांगली ठेवतो.
- रोज मोसंबीचा रस प्यायल्याने रक्त संचार योग्यप्रकारे होतो. मोसंबीचा रस आपली रोग प्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढवते. याने अनेक आजारांपासून लढण्याची शक्ती मिळते.
- मोसंबीमध्ये कॅलरीजचं प्रमाण अधिक प्रमाणात असते. त्यामुळे याचा वजन कमी करण्यातही मदत होते. मोसंबीचा रस मधासोबत प्यायल्यास वजन कमी होऊ शकतं.
- डोळ्यांसाठीही मोसंबीचा रस फायदेशीर मानला जातो. पाण्यात मोसंबीच्या रसाचे काही थेंब टाकून डोळे धुतल्यास कोणत्याही इन्फेक्शनपासून तुम्हाला आराम मिळेल.
- मोसंबीचा रस चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स आणि काळे डाग निघून जातील. मोसंबीचा रस प्यायल्याने रक्त शु्द्ध होतं. यामुळे त्वचेचा रंगही उजळतो.
- -मोसंबीचा रस पाण्यात मिश्रित करुन प्यायल्यास घामाच्या दुर्गंधीची समस्या दूर होते. मोसंबीची ताजी साल चेहर्यावरील व्रण आणि मुरुमे घालवण्यासाठी उपयुक्त आहे. मोसंबाची सालही वातहारक असते.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






