अमळनेर:- अक्षय भिल याच्या मृत्यूच्या निषेधार्थ मंगळवारी (ता.२५) महाराणाप्रताप चौकात रास्ता रोको करून सामान्य जनतेला वेठीस धरणे, विशिष्ट समाजाला अश्लील शिवीगाळ करणे यासह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या २६ जणांसह अज्ञात १५० लोकांवर दंगल, सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अक्षय भिल याच्या खुनाच्या निषेधार्थ भिल समाजाने महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको करून किरकोळ दगडफेक केली. तसेच टायर जाळले आणि सामान्य नागरिकांना दादागिरी करून त्यांचे रस्ते अडवले. यामुळे अनेकांना त्रास झाला. पोलिसांची गाडी देखील आंदोलनकर्त्यांनी अडवली होती.
आंदोलनात धुळे, शिंदखेडा, पारोळा, चाळीसगाव, अमळनेर ग्रामीण भागातून देखील भिल समाज एकत्र झाला होता. महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. त्यामुळे पोलिस प्रशासनातर्फे पोलिस नाईक दीपक माळी यांनी फिर्याद दिली, की विकास भिल, गणेश त्र्यंबक भिल, त्र्यंबक राजाराम भिल (रा. पाइप फॅकटरीजवळ), भय्या भिल (रा. हिवरखेडा, ता. पारोळा), विजय दादा भिल (रा. बंगाली फाइल), विनोद भिल (रा. अवधान, ता. धुळे), रवींद्र भिल (जापी शिरडाने, धुळे), लक्ष्मण भिल (डांगरी),उमेश भिल (राजमाने, ता. चाळीसगाव), सुरेश मोरे, युवराज मोरे, श्यामदेव मोरे, नामदेव मोरे, नरेश भिल (रा. पिंपळे रोड, अमळनेर), रवी सोनवणे, रमेश सोनवणे (रा. ताडेपुरा, पैलाड), अनंत पवार (रुबजीनगर), बापू भिल (रामवाडी), गुलाब बोरसे (रा. हिंगोणे), राजू भिल (दाजीबानगर), युवराज भिल (रा. राजारामनगर), किरण सोनवणे, गलवाडे रोड, मगन रूपचंद भिल (रा. सात्री), रवी सुखदेव मालचे (रा. बोहरा), रतिलाल शेनपडू भिल (रा. कलंबू) यांनी बेकायदा मंडळी जमवून एसटीवर दगडफेक, संशयिताच्या घरावर दगडफेक करून नुकसान केले.
एका समाजाला शिवीगाळ केली. या साऱ्या घटनेचे पोलिसांनी व्हीडिओ चित्रीकरण करून घेतले आहे. म्हणून वरील सर्व संशयितांसह अज्ञात असे एकूण १५० जणांवर सरकारी कामात अडथळा, जिल्हाधिकाऱ्यांच्या ३७ (१) चे उल्लंघन, दंगल, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, रस्ता अडवणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी तपास करीत आहेत.
हे देखील वाचा






