पटणा :- बिहारची राजधानी पटणा येथे एक भयंकर प्रकार घडल्याचं वृत्त आहे. कर्जाच्या बदल्यात अल्पवयीन मुलीशी लग्न लावल्याचा प्रकार उघड झाला आहे. आरोपी 40 वर्षांचा असून पीडिता 11 वर्षांची आहे.या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पाटण्यानजीक मैरवा या गावात राहणाऱ्या पीडितेच्या आईने महेंद्र पांडे या माणसाकडून सुमारे दोन लाख रुपये उधार घेतले होते. बराच प्रयत्न करूनही महिलेला ते पैसे चुकते करता आले नाहीत. त्यामुळे महेंद्र याने पीडितेला आपल्या घरी ठेवलं. त्याच्यावर पीडितेशी लग्न करण्याचा आरोपही आहे. तिला विवाहित महिलेप्रमाणे कुंकू, जोडवी इत्यादी घातलं गेलं. हे सगळं घालत असतानाचा तिचा व्हिडीओ 29 एप्रिल रोजी व्हायरल झाला होता.
त्या व्हिडीओवरून पीडितेच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी महेंद्रला अटक केली आहे. दरम्यान, पीडितेने महेंद्रने आपल्याला पळवलं नसून आपल्या आईनेच पैसे चुकते न करू शकल्याने त्याच्या घरी सोडल्याचं म्हटलं आहे. महेंद्र हा विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याने मुलीला बळजबरीने आपल्या जवळ ठेवलेलं नाही किंवा शारीरिक संबंधही ठेवलेले नाहीत. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
हे देखील वाचा
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल






