निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे
रावेर :- येथील बसस्टँडजवळील एक महिलेच्या घरात शॉट सर्किट झाल्याने आग लागून नुकसान झाले तर शेजारीच असलेल्या सिलेंडरने पेट न घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
सविस्तर वृत्त असे की,दि.२९रोजी संध्याकाळी खंडित झालेला गावातील वीजपुरवठा सुरू झाल्यावर अचानक माधुरी नरेंद्र ब-हाटे या महिला कामानिमित्त घराबाहेर असताना अचानक शॉट सर्किट होत बोर्डाखाली असलेल्या प्लास्टिक वस्तू वितळत कपड्यांनी पेट घेतला त्यात कपडे,मोबाईल,प्लास्टिक टाक्या,इले.फिटिंग यांनी पेट घेतला घरात कोणीही नसल्याने व घरातील धूर पाहून शेजारी असलेल्या सचिन गुल्हाणे यांच्या लक्षात आल्यावर शेजाऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.मात्र तोपर्यंत अनेक जीवनावश्यक वस्तू,मोबाईल,तसेच तांदळाच्या कोठीत बचत गटाचे ठेवलेले १०हजार रुपये रोख व इतर वस्तूंसह ६५ हजारांचा ऐवज जळाला. या घटनास्थळी भेट देत मंडळाधिकारी दीपक गवई,तलाठी समीर तडवी यांनी पंचनामा केला यावेळी गिरीश नेहेते, सुनील कोंडे,काशिनाथ शेलोडे,मयुर ब-हाटे आदी उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.