एरंडोल- पत्नीसह जळगाव येथून धुळे जात असलेला पती एरंडोल बसस्थानकावर लघुशंका करून येतो असे सांगून बेपत्ता झाला.याबाबत माहिती अशी,कि जळगाव येथील विश्रामनगर येथील नंदा रेसिडन्सी रहिवासी व्यंकटेश कालिदास कुलकर्णी (वय-४९) हे पत्नी अरुंधती कुलकर्णी यांचेसह जळगाव येथून धुळे येथे बसने जात होते.
एरंडोल येथील बसस्थानकावर बस आली असता पती व्यंकटेश कुलकर्णी यांनी पत्नीला मी लघुशंका करून येतो असे सांगून बसमधून उतरले.बराच वेळ झाला तरी पती व्यंकटेश कुलकर्णी न आल्यामुळे अरुंधती कुलकर्णी यांनी त्यांचा बसस्थानक परिसरात शोध घेतला तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली मात्र ते सापडले नाहीत.याबाबत अरुंधती कुलकर्णी यांनी पोलीस स्थानकात पती हरवल्याची तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करीत आहेत.व्यंकटेश कुलकर्णी यांचा रंग गोरा असून मध्यम बांधा आहे.डोक्यावर बारीक केस असून त्यांची उंची पाच फुट आहे.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






