लोकप्रतिनिधींनी कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पार पाडावी.-आमदार चिमणराव पाटील.
एरंडोल-लोकप्रतिनिधींनी विकासकामे करतांना कोणत्याही घटकावर अन्याय न करता सर्वांना न्याय देवून कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पार पाडावी असे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.शहरात सुमारे चौदा कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.आमदार चिमणराव पाटील,भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख अॅड.किशोर काळकर यांच्याहस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन प्रमुख पाहुणे होते.
यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी शहरात मंजूर झालेल्या व पूर्ण झालेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेल्या सरकारच्या काळात राज्यात विकासाची घौडदौड वेगाने सुरु असल्याचे सांगितले.लोकप्रतिनिधी मतदारसंघाचे प्रमुख असल्यामुळे त्यांनी मतदारसंघ कुटुंब मानून कुटुंब प्रमुखाची जाबाबदारी पार पाडावी असे आवाहन केले.राजकीय जीवनात मतदारांना दिलेली आश्वासाने पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे सांगितले.
शहरातील विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाल्यामुळे शहरात विकासाची गंगा कायम सुरु राहणार असल्याचे सांगितले.विकासकामांना विरोध करणारे विरोधक समाजाचे शत्रू असल्याची टीका त्यांनी केली.मतदारांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे सांगितले.मतदारसंघात काम करतांना सर्वाना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे मतदारांच्या चेह-यावर दिसणारे समाधान मानसिक आनंद देणारे असल्याचे सांगितले.आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख अॅड.किशोर काळकर यांनी आमदार चिमणराव पाटील मतदार संघाच्या विकासाची दूरदृष्टी ठेवून काम करणारे लोकप्रतिनिधी असल्याचे सांगितले.शहरात आवश्यक असलेल्या कामांसाठी आमदार चिमणराव पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे मतदार काम करणा-या पदाधिका-यांच्या मागे उभे राहत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना,हद्दवाढ योजना,नागरी दलित वस्त योजना,नगरोत्थान योजना या योजनांच्या माध्यमातून स्मशानभूमी बांधकाम,नवीन वसाहतींमध्ये गटार व रस्त्याचे बांधकाम,डेली बाजार,सरस्वती कॉलनीत समाजमंडप,महिला व पुरुषांसाठी अत्याधुनिक व्यायाम शाळा,विपश्यना केंद्र,वीर एकलव्य चौकाचे सुशोभीकरण यासह रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे आदी सुमारे चौदा कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी प्रास्ताविक केले.करनिरीक्षक डॉ.अजित भट यांनी सुत्रसंचलन केले.योगेश सुकटे यांनी आभार मानले.यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच आमदार चिमणराव पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सरस्वती कॉलनीतील रहिवाशांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,चिंतामण पाटील,प्रा.शिवाजीराव अहिरराव,माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील,गुड्डू जोहरी,संजय भदाणे,माजी नगरसेवक डॉ.नरेंद्र ठाकूर, प्रा.एम.एस.पाटील ,प्रा.एस.जे.पाटील,जिजाबराव पाटील, प्रा.डी.डी.पाटील, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,विठ्ठल वंजारी,राजेंद्र ठाकूर,बांधकाम अभियंता देवेंद्र शिंदे,संगणक अभियंता विकास पंचबुद्धे,नगररचनाकार सौरभ बागड,भूषण महाजन,विनोद पाटील,मयूर महाजन,गोविंद बिर्ला यांचेसह पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.