उमरदे ता.एरंडोल जवळ आयशर मोटर सायकलच्या अपघातात युवक ठार,एक जण गंभीर जखमी

Spread the love

एरंडोल :- भरधाव वेगाने येणा-या आयशरने समोरून येणा-या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात २२ वर्षीय युवक जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.हा अपघात काल (ता.३) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास म्हसावद रस्त्यावरील उमरदे गावाजवळ असलेल्या पुलाजवळ झाला.

याबाबत माहिती अशी,कि खेडगाव तांडा (ता.एरंडोल) येथील भाईदास संतोष राठोड व संदीप खिमा जाधव हे मोटर सायकल क्रमांक एम.एच.४१ बी.जी.४५८४ ने काल सायंकाळी पाच वाजता एरंडोल येथून कपडे व अन्य वस्तूंची खरेदी करून खेडगाव तांडा येथे जात होते.उमरदे गावाजवळ असलेल्या पुलाजवळ त्यांच्या मोटर सायकलला म्हसावद करून येणा-या आयशर क्रमांक डी.एन.०९ एन.९८९० ने जोरदार धडक दिल्यामुळे संतोष खिमा जाधव (वय-२२) जागीच ठार झाला तर भाईदास संतोष राठोड हे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर संदीप जाधव यांच्या मागे मोटरसायकलने येणारे मयत संदीप जाधव यांचे मामा सुनील ताराचंद राठोड व दिनेश रमेश पवार यांना अपघात झाल्याचे दिसले.अपघातानंतर उमरदे येथील ग्रामस्थांनी आयशर थांबवली.सुनील राठोड व दिनेश पवार यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात आणले असता संदीप राठोड हे मयत झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी सांगितले तर जखमी भाईदास राठोड यांचेवर उपचार सुरु आहेत.याबाबत सुनील राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून आयशरचालक महेंद्रसिंग प्रतापसिंग राजपूत रा.दादरा नगर हवेली याचेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेंद्र पाटील तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

टीम झुंजार