Video Viral : नवऱ्याच्या विरोधात घटस्फोटाचा दावा दाखल केलेल्या पत्नीला वकिलासोबत घरातच रंगेहात पकडलं

Spread the love

Video Viral : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एका नवऱ्याने आपल्या बायकोला घरातच रंगेहात पकडल्याचं समोर आलं आहे. यावेळी नवऱ्याने पोलिसांनाही बरोबर नेलं असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सदर पत्नीने नवऱ्याविरोधात छळाची तक्रार दाखल केल्याची माहिती आहे.
दरम्यान, उत्तरप्रदेशमधील कानपूर येथील ही घटना असून ज्या महिलेने आपल्या नवऱ्या विरोधात घटस्फोटाचा दावा दाखल केला त्याच महिलेने आपल्या वकिलासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले आहेत. सदर महिलेने पतीविरोधात ४९८-अ यानुसार दावा दाखल केला असल्याची माहिती आहे.

https://twitter.com/KyaaBaatHai/status/1654048294119837696?t=N7mFfpURil0Pn02n80PisA&s=19

पतीने रंगेहात पकडल्यानंतर वकिल नि:शब्द झाला असून तो घाबरलेला दिसत आहे, तर पत्नीच्या डोळ्यामध्ये कोणतीच भिती दिसत नाही. तिच्या बोलण्यात आत्मविश्वास दिसत आहे. घरातून बाहेर निघताना, “तुमची फोटोग्राफी झाली असेल तर चला” असं ती बोलताना दिसत आहे.हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दिपीका नारायण भारद्वाज यांनी ट्वीटरवर हा व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हे देखील वाचा

टीम झुंजार