जळगाव : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथुन जवळच असलेल्या चौपदरी मुंबई- नागपूर महामार्गावरील फुलगाव उड्डाण पुलावर हरताळा येथुन मोटरसायकलने देवदर्शन घेऊन भुसावळकडे परतणाऱ्या दाम्पत्याला अज्ञात वाहनाने धडक दिली.यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी जखमी आहे. ग्रामिण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई- नागपूर चौपदरी महामार्गावरील फुलगाव जवळील उड्डाण पुलावर आज (५ मे) सकाळी ही घटना घडली. भुसावळ येथील ललीत प्रभाकर नेमाडे (वय ४८) हे पत्नी निता नेमाडेसह पौर्णिमेच्या मुहुर्तावर हरताळा येथे सकाळीच मोटारसायकलने देवदर्शनाला गेले होते. देव दर्शन आटोपून घरी भुसावळला आपल्या मोटर सायकल क्र एम. एच १९ डी एस ३३५६ ने जात असताना फुलगावजवळील उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात पती- पत्नी फेकले गेले. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले.
अपघात झाल्या नंतर बराच वेळ पती पत्नी जागेवर पडून होते . या दरम्यान या मार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असताना कोणीही या अपघातग्रस्तांना लक्ष दिले नाही. मात्र बऱ्याच वेळानंतर जखमी अवस्थेत असलेल्या नीता नेमाडे ह्या मदती साठी आक्रोश करीत असल्याचे वरणगाव येथील मनोज पंढरीनाथ ढाके हे आपल्या पत्नी सोबत त्याच मार्गावरून भुसावळला जात असताना मदती आक्रोश करीत असल्याचे लक्षात येताच अपघातग्रस्तांना मदतीसाठी धाव घेऊन वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये घटनेची माहिती देत ग्रामीण रुग्णालयात पोहचविण्यासाठी मदत केली
उपचारापुर्वीच मृत्यू….
त्यांना महामार्गाच्या रुग्णवाहिकेने वरणगाव ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. मात्र ललीत नेमाडे यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी मयताची पत्नी निता ललीत नेमाडे (वय ४०) यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन अज्ञात वाहनाचा व पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कुमार आडसूळ यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
हे देखील वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.