निंभोरा जि प कन्या शाळेच्या शिक्षिका चा निरोप प्रसंगी सत्कार

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे

रावेर :- तालुक्यातील निंभोरा कन्या शाळेतील शिक्षिका जयश्री भारबे व वैशाली कोलते या दोन्ही शिक्षिका च्या नुकत्याच बदल्या झाल्या या प्रसंगी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शाळा व्यवस्थान समिती अध्यक्ष मीनाक्षी महाले उपाध्यक्ष असलम खान व पदाधिकारी मान्यवररांनी त्याचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला .

यावेळी जेष्ठ पत्रकार काशिनाथ शेलोडे यांनी त्याच्या 10 वर्षाच्या ज्ञानदान कार्याचे विद्यार्थीनी बद्दल च्या प्रेमाचे जिव्हाळ्या च्या सबंधाचे व पालकांशी ठेवलेल्या सबंधा चे आपल्या मनोगतात वर्णन करुन पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या तसेच मुख्याध्यापक तुषार वाणी ग्रामपंचायत सदस्य दिलशादशेख सर सेवानिवृत्त शिक्षक भागवत ठाकरे यांनी पण आपल्या मनोगतातून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शिक्षिका भारबे व कोलते यांनी सत्काराला उत्तर देऊन आयोजकाचे आभार मानले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्तविक शिक्षक हेमंत चौधरी यांनी केले कार्यक्रमाला विद्यार्थी नी शा पो आ स्वयंपाकी मदतनीस रंजना चौधरी उपस्थित होत्या

हे वाचलंत का ?

टीम झुंजार