मालेगाव: तालुक्यातील आघार-ढवळेश्वर रस्त्यालगत राहणाऱ्या यशवंत लक्ष्मण हिरे (वय ४२) व त्यांचा लहान मुलगा रुद्र यशवंत हिरे (वय ६) या पिता-पुत्रांनी अजंग शिवारातील शेती महामंडळाच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
आघार येथील यशवंत हिरे यांचा पशुखाद्यचा व्यवसाय आहे. विशेषत: म्हशींना लागणारे बिअर खाद्य ते घाऊक भावाने घेऊन ग्रामीण भागात त्यांच्या पिकअपमधून किरकोळ विक्रेत्यांना विकतात. आज सकाळी त्यांनी मुलगा रुद्र यालाही बरोबर घेतले. शहरालगतच्या मनमाड चौफुलीवरुन बिअर खाद्य घेत ते पिकअपमध्ये भरले.
पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तातडीने मालेगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे शकील तैराक यांनी प्रथम यशवंत यांचा व नंतर रुद्रचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
यशवंत यांनी मुलगा रुद्रला मिठी मारली होती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविला. या घटनेमुळे आघार व परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्या का केली याचा तपास पोलिस करीत आहेत.
वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची चर्चा होत असून परिसरात बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






