अनिल बोरनारे भाजपा प्रदेश कार्यकारणीत निमंत्रित सदस्य नियुक्त

Spread the love

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली कार्यकारिणीची घोषणा

निंभोरा प्रतिनिधी / परमानद शेलोडे

भारतीय जनता पार्टी चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली यात शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांची निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली असून अनिल बोरनारे यांना आता भाजपाच्या मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी मिळाली आहे.


काल मुंबईत प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कार्यकारिणी जाहीर केली कार्यकारिणीच्या यादीत अनिल बोरनारे यांचे नाव निमंत्रित सदस्य म्हणून जाहीर झाल्याने त्यांच्यावर समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनिल बोरनारे सध्या कर्नाटकात भाजपाच्या प्रचारात असून कर्नाटकात प्रचारात असलेले राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अनिल बोरनारे यांचे अभिनंदन केले.


अनिल बोरनारे यांचे शैक्षणिक क्षेत्रात मागील २४ वर्षात मोठे कार्य असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षक परिषदेत संघटनमंत्री, उत्तर विभाग अध्यक्ष, भाजपा शिक्षक आघाडीचे कोकण व मुंबई विभागाचे संयोजक, भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व आता भाजपाच्या मुख्य प्रवाहात निमंत्रित सदस्य म्हणून प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.


भाजपाच्या मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी मिळाल्याने शैक्षणिक क्षेत्रातील समस्या, शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात मदत होणार असून या कामाला अधिक गती मिळणार असल्याचे सांगून केंद्र व राज्यातील शासनाच्या योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार