पाचोरा : – सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील गिरणा नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने वाहन महामार्गावरील खांबावर आदळल्याने ट्रॅक्टर पल्टी होऊन चालकाच्या डोक्याला जबरी मार लागला. त्यात २० वर्षाचा युवक जागीच ठार झाला. अपघाताची घटना शनिवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान भडगाव रोडवरील हाॅटेल स्वप्नशिल्प समोर घडली.घटनेप्रकरणी पाचोरा येथील ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत युवकाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केल्यानंतर मयतावर चिंचखेडा खु” येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण गाव शोकाकुल झाले होते.
चिंचखेडा खु” तालुका पाचोरा येथील पवन हिम्मत पाटील (वय – २०) वर्ष हा कृष्णापूरी येथील एका इसमाचे ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होता. शनिवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान गिरणा नदीपात्रातून वाळू भरुन पाचोरा शहराकडे भरधाव वेगाने येत असतांना हॉटेल स्वप्नशिल्प समोर अचानक टायर फुटला त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॉक्टर चांदवड – जळगाव महामार्गावरील इलेक्ट्रीक खांबावर आदळले व पल्टी झाले त्यात पवन हिम्मत पाटील यांच्या डोक्याला व चेहऱ्याला जबरी मार लागला त्यात पवन हा जागेवर ठार झाला.
घटनेची माहिती ट्रॅक्टर मालक व त्यांचे काही त्याचे साथीदारांना मिळताच त्यांनी तात्काळ तुटलेला खांब व वाळू दुसऱ्या वाहनात भरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पवन हा आई वडीलास एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील हिम्मत पाटील हे सारोळा बु” ता. पाचोरा येथील अविनाश देशमुख यांचेकडे मजूरी करतात. पवन यास एक बहिण व वृद्ध आई – वडील असा परिवार आहे.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.