विवेकानंद विद्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष पूर्तता दिन उत्साहात संपन्न

Spread the love

चोपडा ( डॉ सतीश भदाणे) येथील विवेकानंद विद्यालयात आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष पूर्तता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. विद्यालयाचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका आशा चित्ते, संजय सोनवणे, पवन लाठी यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्रतिमा पूजन करण्यात आले.

विद्यालयातील उपशिक्षक पवन लाठी यांनी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकत, साध्या सोप्या भाषेत सविस्तर माहिती सांगितली. स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना याप्रसंगी प्रशस्तीपत्र व गुणपत्रकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पवन लाठी यांनी केले फलकलेखन कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी केले.कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विभागाचे सर्व शिक्षक बंधू -भगिनी, कर्मचारीवृंद, विद्यार्थी ,उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने करण्यात आली.

हे देखील वाचा

टीम झुंजार