Viral Video :अचानक आलेल्या पावसामुळे नवरदेव – नवरीनी यांनी चक्क छत्री घेऊन पूर्ण केली सप्तपदी.

Spread the love

Viral Video : सोशल मीडियावर सतत कोणता ना कोणता व्हिडीओ ट्रेंडिगमध्ये असतो. लग्नाचा सीझन असल्यामुळे लग्न सोहळ्यांमधले व्हिडीओही सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. कुठे नवरा-नवरीचा डान्स फेमस होतोय, तर कुठे भांडणं होतायत, त्यांचेही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे.

लग्नसोहळा म्हणजे वधूवराच्या दिवसातला महत्त्वाचा दिवस असतो. आता हा दिवस पावसाळ्यात आला तर? तर भंबेरी उडण्याची शक्यता जास्त असते. या व्हिडीओमध्ये नवरा-नवरीची धांदल उडलेली दिसत आहे. लग्नाच्या विधीदरम्यानचा हा व्हिडीओ आहे. विधी सुरू असतानाच मांडवात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या नवरा-नवरीने चक्क हातात छत्री घेऊन सप्तपदी घेतली आहे.

https://www.instagram.com/reel/Crqh8kzJTAX/?igshid=YmMyMTA2M2Y=

या व्हिडीओमध्ये आणखीही काही लोकांचे आवाज ऐकून येत आहेत, ज्यामध्ये हे लोक दोघांच्याही सप्तपदीसाठी घाई करताना दिसत आहेत. तसंच काही लोक या लग्नाची चांगलीच थट्टाही करत आहे. हा व्हिडीओ मध्यप्रदेशातला असल्याचं सांगण्यात येत आहे. लग्नाचे विधी सुरू असतानाच ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि तुफान पावसाला सुरुवात झाली.त्यामुळे दोघांना छत्री घेऊन सप्तपदी घ्यावी लागली, तर दुसरीकडे गुरुजी आडोशाला उभं राहून मंत्र पठण करत होते. हा व्हिडीओ पाहणारे लोक नवरा नवरीच्या इच्छाशक्तीचंही कौतुक करताना दिसत आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार