जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
दिवस कौटुंबिक कामात जाईल. उत्तम मानसिक सौख्य लाभेल. भावंडांविषयीचे गैरसमज मनातून काढून टाका. अनाठायी खर्च केला जाईल. मित्रांशी वादाचे प्रसंग उद्भवू शकतात.
वृषभ :-
जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. व्यावसायिक लाभाने संतुष्ट राहाल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. प्रवास मजेत होईल.
मिथुन :-
संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्यावी. आवडते पदार्थ खायला मिळतील. दिवस कुटुंबासमवेत मजेत जाईल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.
कर्क :-
आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. दिवस स्वत:च्या मर्जीप्रमाणे घालवाल. जोडीदाराच्या वागण्याच्या अचंबा वाटेल. उष्णतेचे विकार संभवतात. हितशत्रूंकडे लक्ष द्यावे.
सिंह :-
विरोधकांचा विरोध मावळेल. मानसिक चंचलतेवर विजय मिळवा. नवीन लोक संपर्कात येतील. पत्नीशी वाद वाढवू नयेत. कामात चांगली स्थिरता येईल.
कन्या :-
मनातील इच्छा पूर्ण होईल. आवडत्या वस्तूंची खरेदी केली जाईल. मित्र परिवारात वाढ होईल. तुमची समाजप्रियता वाढेल. कामात वडीलांचे सहकार्य घेता येईल.
तूळ :-
दिवसभर कामात व्यग्र राहाल. थोरांचे योग्य मार्गदर्शन लाभेल. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ होईल. व्यावसायिक ठिकाणी मान वाढेल. काही कामे उगाचच अडकून पडतील.
वृश्चिक :-
धार्मिक कामात मदत कराल. योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. इतरांना स्वखुशीने मदत कराल. एखादी नवीन संधी चालून येईल. कौटुंबिक प्रश्न सामोपचाराने हाताळा.
धनू :-
अचानक धनलाभ संभवतो. सट्टा रेस यांतून फायदा होईल. कमी श्रमात कामे पूर्ण होतील. महत्त्वाची कामे पुढे सरकतील. अती विचार करू नका.
मकर :-
जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. दिवस कौटुंबिक सौख्यात जाईल. सकारात्मक विचार करावेत. रागावर नियंत्रण ठेवा. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
कुंभ :-
हाताखालील नोकरांकडून कामे वेळेत पूर्ण होतील. दिवसभरातील कामाने समाधानी राहाल. क्षुल्लक गोष्टीने चीडू नका. बाग कामात मन रमवावे. मुलांच्या समस्या जाणून घ्याव्यात.
मीन :-
मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. जुगारातून धनलाभ संभवतो. हस्त कौशल्याला प्राधान्य द्यावे. नवीन गोष्टी आवडीने जाणून घ्याल. आवडते साहित्य वाचायला मिळेल.
हेही वाचलंत का ?
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.
- धुमधडाक्यात आली वरात, डी जे वाजवण्यावरून झाला वाद, लग्नाचा आनंद क्षणात दुःखाच्या सागरात बुडाला, लग्नात असं काय घडलं?