शिर्डीत सहा हॉटेल्समधील वेश्याव्यवसायावर छापे, 15 पीडित मुलींची सुटका, 11 पुरुषांना घेतले ताब्यात

Spread the love


कोपरगाव :- शिर्डीतील सहा हॉटेल्सवर पोलिसांनी एकाच वेळी छापे मारून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत 15 मुलींची सुटका करण्यात आली असून, 11 पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे.याप्रकरणी शिर्डी पोलिसांत ‘पिटा’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईमुळे शिर्डीसारख्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अनैतिक व्यवसाय करणाऱयांना मोठा दणका बसला आहे.

शिर्डीतील काही हॉटेल्समध्ये मोठय़ा प्रमाणावर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. त्यांनी शुक्रवारी रात्री सापळा रचून एकाच वेळी ‘हॉटेल एक्झिक्युटिव्ह इन’, ‘हॉटेल साई कीर्ती पॅलेस’, ‘हॉटेल एसपी’, ‘हॉटेल साई शीतल’, ‘हॉटेल गणेश पॅलेस’, ‘हॉटेल साई महाराजा’ या सहा हॉटेल्सवर छापे टाकले. तेथे 11 पुरुषांना ताब्यात घेण्यात आले असून, 15 पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे.

याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये ‘पिटा’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, शिवाजी डोहीफोडे, मेघश्याम डांगे, चौधरी, पाटील, इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, थोरात, उपनिरीक्षक बोरसे व इतर पोलीस अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई केली आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार