जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
तुमचा आवेग योग्य ठिकाणीच दाखवा. काही ठिकाणी नरमाईचे धोरण ठेवणे योग्य ठरेल. मैत्रीतील कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा. अनोळखी लोकांवर चटकन विश्वास ठेवू नका. कौटुंबिक कामे आनंदाने कराल.
वृषभ :-
घरगुती कामे वाढतील. स्थावरचे प्रश्न मार्गी लावावे लागतील. खळाळता उत्साह मावळू देऊ नका. अती कामामुळे थकवा जाणवेल. कामानिमित्त जवळचा प्रवास करावा लागेल.
मिथुन :-
वैचारिक गोंधळ टाळण्याचा प्रयत्न करावा. मनात अनेक शंका उत्पन्न होऊ शकतात. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कौटुंबिक जिव्हाळा वाढीस लागेल. बोलतांना विचारपूर्वक बोलावे.
कर्क :-
स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. प्रकृतीची वेळीच काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. अनावश्यक गोष्टींवर खर्च केला जाईल. मनातील अपेक्षांना मूर्त स्वरूप द्याल.
सिंह :-
नवीन लोकांशी मैत्री वाढेल. तरुण वर्गाच्या जास्त संपर्कात याल. आधुनिक विचारांची देवाणघेवाण होईल. मानसिक चांचल्य जाणवेल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका.
कन्या :-
पोटाची काहीशी तक्रार राहील. आहाराची योग्य ती पथ्ये पाळावी लागतील. नियोजनबद्ध कामे सुरळीत पार पडतील. प्रवास सावधानतेने करावा. मन लावून काम करणे गरजेचे राहील.
तूळ :-
जोडीदाराची मते जाणून घ्या. वडिलोपार्जित कामे लाभदायक ठरतील. बाहेर गावी जाण्याचे बेत आखाल. कायद्याच्या चौकटीत राहून कामे करावीत. मनातील क्षुल्लक गैरसमज दूर करावेत.
वृश्चिक :-
जोडीदाराची प्राप्ती वाढेल. स्थावरची कामे अचानक सामोरी येऊ शकतात. पूर्व नियोजित कामात यश येईल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. नको तिथे आपले मत मांडू नका.
धनू :-
तुमच्या कर्तृत्वात वाढ होईल. कोणतेही काम करतांना सर्व खात्री करून घ्यावी. खेळाडूंनी अधिक कसरत करावी. महत्वाकांक्षेच्या जोरावर धाडस करतांना सावधानता बाळगा. अचानक धनलाभ संभवतो.
मकर :-
मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही प्रलोभनाला भुलून जाऊ नका. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अनावश्यक खर्च केला जाईल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल.
कुंभ :-
घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. प्रवासात सामानाची काळजी घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहावे. कसलीही घाई त्रासदायक ठरू शकते. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.
मीन :-
वादाचे प्रसंग टाळलेलेच बरे. कलात्मक दृष्टीकोन ठेवून वागाल. गप्पा मारण्याची हौस पूर्ण कराल. इतरांचा तुमच्या विषयी गैरसमज होऊ शकतो. व्यावसायिक लाभावर लक्ष केन्द्रित करा..
हेही वाचलंत का ?
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.