40 पर्यटकांनी भरलेली बोट उलटली, 21 पर्यटकांनी गमावला जीव 10जणांना वाचविण्यात यश,मृतांमध्ये मुले आणि महिलाच्या समावेश

Spread the love

मलप्पूरम :- केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात रविवारी पर्यटकांची बोट उलटून 21 जणांचा मृत्यू झाला. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, बोटीत 40 हून अधिक लोक होते. केरळचे क्रीडा मंत्री व्ही अब्दुररहमान यांनी वेगवेगळ्या रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 21 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले मृतांमध्ये बहुतेक मुले आणि महिला आहेत. 4 जणांना गंभीर अवस्थेत कोट्टाक्कल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने किंवा लाँग विकेण्ड पकडून अनेक जण फिरायला गेले होते.

मात्र या वेळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. पर्यटकांनी भरलेली नाव उलटून मोठी दुर्घटना घडली. केरळमधील मलप्पूरम जिल्ह्यातील तनूरजवळ पर्यटकांची बोट उलटून 21 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन सकाळी तनूर दुर्घटनास्थळी भेट देणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे आज होणारे राज्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकृत कार्यक्रम रद्द करण्यात आली आहेत. अपघाताच्या वेळी बोटीत सुमारे 40 लोक होते. राज्यमंत्री व्ही अब्दुरहमान यांनी माहिती दिली की केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा अपघात रात्री उशिरा झाला.

अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी पोलीस आणि NDRF घटनास्थळी दाखल झाले. मात्र अंधार असल्याने बचाव कार्यात अनेक अडथळे देखील येत होते. बचावासाठी टॉर्च पेटवून लोकांचा शोध घेतला जात असल्याचे व्हिडिओमध्ये सोशल मीडियावरुन समोर आले आहेत.

केरळमधील या घटनेवर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार