धक्कादायक!सख्खा भावाने आधी केला लहान बहिणीशी वाद मग पेव्हर ब्लॉकने ठेचून केली तिची निर्घृण हत्या.

Spread the love


येवला : श्री साईबाबा देवस्थानामुळे जगभर प्रसिद्ध असलेल्या शिर्डीमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भावाने सख्ख्या बहिणीला राहत्या फ्लॅटच्या बेडरुममध्ये मोठ्या पेव्हर ब्लॉकने ठेचून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी संध्याकाळी शिर्डीतील कालिकानगरजवळ असलेल्या मयुरेश्वर कॉलनीत उघडकीस आली आहे. या घटनेने शिर्डीसह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

ज्ञानेश्वरी नवनाथ कुलथे (वय १७ वर्षे) असे मयत अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याबाबत शिर्डी पोलिस ठाण्यात मयताचा भाऊ श्रूत नवनाथ कुलथे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घेऊन घटनास्थळी पोहोचले. मयत मुलीचे आजोबा प्रवीण काशिनाथ विसपुते (वय ६५ वर्षे, रा.कालिकानगर, शिर्डी, ता.राहाता) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार २ मे रोजी सायंकाळी साडेचार ते सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात आरोपीने त्यांची नात (वय १७ वर्षे, रा. सौंदडी बाबा मंदिराजवळ, शिर्डी, ता.राहाता) हिच्या डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक घालून डोक्याचा आणि चेहऱ्याचा चेंदामेंदा करून तिचा खून केला.
अज्ञात इसमाविरुध्द ही फिर्याद देण्यात आली होती.

याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शेजारील नागरिकांची चौकशी केली असता पोलिसांना वेगळाच संशय आला. यानंतर पोलिसांना मुलीच्या भावाबद्दल माहिती मिळाली आणि तपासाला वेगळेच वळण लागले. सदर आरोपीचा शोध घेत असताना येवला ग्रामीणचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांना पेट्रोलिंग दरम्यान एक संशयित मोटारसायकलस्वार दिसला. त्याच्या पायाला रक्ताचे डाग होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याने सहज आपले खरे नाव सांगितले.

यानंतर पोलिसांनी त्याला रक्ताच्या डागाबद्दल विचारले असता, आरोपी भावाने असे काही उत्तर दिले की, पोलिस अधिकारी हादरूनच गेले. आपण राहत्या घरीच लहाण बहिणीशी वाद झाल्याने तिच्या डोक्यात दगडघालून तिला संपवल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले आणि हे ऐकून पोलिसांना धक्काच बसला.
यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

हे देखील वाचा

टीम झुंजार