भीषण अपघात!नदीच्या पुलाचे रेलिंग तोडून ५० फूट खाली कोरड्या नदीत बस कोसळली 20 ठार 15 जखमी.

Spread the love

खरगोन (मध्य प्रदेश) येथे आज (दि.०९) सकाळी ८.३० च्या सुमारास मोठी बस दुर्घटना घडली. खरगोन जिल्ह्यातील श्रीखंडीहून इंदूरकडे जाणारी बस पुलावरून कोसळली.यामध्ये २० प्रवाशांचा मृत्यू झाला असून, १५ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असल्याची अशी माहिती खरगोनचे एसपी धरम वीर सिंग यांनी दिली आहे.खरगोन जिल्ह्यातील श्रीखंडीहून इंदूरकडे जाणारी बस अचानक बोराड नदीच्या पुलाचे रेलिंग तोडून ५० फूट खाली कोसळली. MST हिरामणी ट्रॅव्हल्सची क्रमांक MP 10 P 7755 ही बस ओव्हरलोड होती. यामध्ये एकूण ३५ प्रवाशी होते.

यामधील २० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ड्रायव्हर, कंडक्टर आणि क्लिनरचा समावेश आहे. या दुर्घटनेती जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खरगोन जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी खरगोनचे एसपी, जिल्हाधिकारी आणि आमदार घटनास्थळी पोहोचले आहेत. अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
खरगोनचे एसडीएम राकेश मोहन शुक्ला यांच्या माहितीनुसार, पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच गाम्रस्थांनी बचावकार्य सुरू केले. त्यांनी बसच्या काचा फोडून अनेक जखमी प्रवाशांची सुटका केली. त्यांनी त्यांच्याच वाहनांतून जखमींना रुग्णालयात नेले.

ड्रायव्हरला डुलकी लागली असावी – एसडीएम…….
एसडीएम यांनी सांगितले की, हा अपघात जिल्हा मुख्यालयापासून 34 किमी अंतरावरील उन पोलिस स्टेशन हद्दीतील डोंगरगावजवळ घडला. सध्या बस चालकाचा पत्ता लागला नाही. प्राथमिक माहितीनुसार, चालकाला डुलकी लागल्यामुळे बसवरील नियंत्रण सुटल्याचे दिसून येत आहे.
सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना तात्काळ मदत जाहिर…..
मध्य प्रदेश सरकारने खरगोन बस अपघातात मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी 25,000 रुपये तत्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती एनआयने दिलेल्या वृत्तात दिली आहे.

मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये मंगळवारी सकाळी 8.40 च्या सुमारास एक बस 50 फूट उंच पुलावरून नदीत कोसळली. खरगोनचे एसपी धरमवीर सिंह यांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 3 मुलांसह २० जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झालेत. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही २० प्रवाशांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. १५ जण जखमी झालेत. जखमींना लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आलेत.

हे देखील वाचा

टीम झुंजार