नवरदेव-नवरी लग्न लावून घरी जात असतांनाच झाले असे की दोघांच्या…… ज्या मंडपात जल्लोष झाला त्याठिकाणी रडारड आणि शोक…..

Spread the love

नालंदा :- बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील गिरियक पोलीस ठाणे परिसरातील पुरैनी गावाजवळ हा अपघात झाला. ज्या कारमधून नवरदेव आणि नवरी जात होती. त्या कारला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली.त्यात नवरदेव आणि नवरीचा जागीच मृत्यू झाला. तर नवरदेवाचा भावोजी गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी ट्रॅक्टरसहीत फरार झाला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
असा झाला अपघात……
सतौआ गावचे रहिवासी कारू चौधरी यांची मुलगी पुष्पा कुमारी (वय 20)चा विवाह नवादाच्या महराना गावातील श्याम कुमार (वय 27) याच्याशी झाला होता. लग्नानंतर शनिवारी दुपारी पुष्पाला निरोप देण्यात आला. इनोव्हा कारमध्ये बसून श्याम आणि पुष्पा बसले होते. त्यांच्यासोबत श्यामचा भावोजीही होता. महारानाकडे हे नवदाम्प्त्य निघालं होतं.

दुपारी 3 ते 4 च्या सुमारास त्यांची गाडी पुरैनी गावच्या जवळ आळी. त्याचवेळी वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर वेगाने आला आणि त्याने कारला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की कार रस्त्याच्या कडेला उतरली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला अन् श्याम आणि पुष्पाचा जागीच मृत्यू झाला. यात श्यामचा भावोजी आणि कार चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

ट्रॅक्टर चालक फरार…..
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तात्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. श्यामच्या भावोजीला विम्स रुग्णालयात दाखल केले. या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून ट्रॅक्टर चालकाचा शोध घेतला जात आहे.

रडारड आणि शोक…..
लग्न होऊन काही तासही झाले नाही. नवरा-नवरी गळ्यात वरमाला घालूनच आपल्या गावाकडे निघाले होते. तितक्यात अपघात झाला आणि दोघांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच वर आणि वधूकडील मंडळींना धक्का बसला. नातेवाईक आणि संपूर्ण गावालाच हा धक्का बसला. ज्या मांडवात काही तासांपूर्वी जल्लोष झाला त्याच मांडवात रडारड आणि आक्रोश सुरू झाला. या प्रकरणी आरोपीला पकडून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार