प्रतिनिधी | अमळनेर
अमळनेर :- तालुक्यातील प्रगणे डांगरी येथील २४ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टरला वट लावायला गेला असताना डोके चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला आहे.ते पाहून ट्रॅक्टर चालक फरार झाला असून त्याचा विरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ८ मे रोजी रात्री १० वाजता अविनाश प्रकाश शिसोदे हा बाजरी काढून ट्रॅक्टर मधून धान्य घेऊन ट्रॅक्टर भरून गावात आला व ट्रॅक्टर घराकडे नेत असताना उतरतीवर त्याने वट लावण्यास किरण सुनील पवार या तरुणास बोलविले.
किरण हा मागील चाकास वट लावणार तोच अविनाश याने ट्रॅक्टर चालविल्याने किरण हा भरलेल्या ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली डोके आल्याने त्याची कवटी फुटून रक्त निघाले. व तो काहीच हालचाल करीत नसल्याने त्यास पाहिले असता त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी अविनाश प्रकाश शिसोदे हा ट्रॅक्टर सोडून पळून गेला.
गावातील लोकांनी त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले , त्याचे डॉक्टर जी एम पाटील यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपविल्यावर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले ,याबाबत आज दिनांक ९ रोजी सुनील गुणवंतराव पवार यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार मुकेश साळुंखे हे करीत आहेत.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






