अनैसर्गिक कृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल करेल ,मुलाचे अपहरण,संसार उद्ध्वस्त करेल,अश्या धमक्या देत होता आरोपी.
छत्रपती संभाजीनगर : पाण्यातून गुंगीचे औषध देऊन महिलेसोबत अनैसर्गिक कृत्य केले, इतकंच नाही तर त्याबाबतचा व्हिडिओ काढून महिलेला धमकी देत दिल्याची धक्कादाय प्रकार समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मुख्तार खान उर्फ बब्बू याच्यावर याप्रकरणी चौक पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू करतात तो फरार झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मुख्तार खान उर्फ बब्बू याच्याविरोधात एका महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. महिलेला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन आरोपी मुख्तार खान याने महिलेसोबत अनैसर्गिक कृत्य केले. तसेच त्याचा व्हिडिओ काढून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेने शहरातील सिटी चौक पोलिसात तक्रार दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दिल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
काय आहे प्रकरण : पीडित ३३ वर्षीय महिलेने सिटी चौक पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार, महिला आपल्या घरी यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी असलेला मुख्तार खान उर्फ बब्बू याने महिलेला मानसीक त्रास दिला. कधी त्या पीडितेचा पाठलाग करायचा. मुलाचे अपहरण करेल, पतीला मारहाण करेल, संसार उद्धवस्त करेल, अशी धमकी महिला देत होता. यासर्व गोष्टीला कंटाळून महिला त्याच्या घरी गेली. त्यानंतर महिलेला पाण्यातून गुंगीचे औषध देत तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले आणि त्याचा व्हिडिओ बनवला.
बदमानी करण्याची धमकी : पीडिता एकदा टाऊन हॉल परिसरातून जात असताना आरोपी मुख्तार याने अश्लील हातवारे करत तिला त्रास दिला. त्यानंतर त्याने तिचा पाठलाग करून तिचे घर गाठले. महिलेला तुझ्या मुलांचे अपहरण करेल आणि पतीलाही मारहाण करून तुझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवून संसार उद्ध्वस्त करेल, अशी धमकी दिली. या गोष्टीतून या त्रासातून मुक्ती मिळेल यासाठी महिलेने कंटाळून त्या व्यक्तीच्या घरी गेली. महिला घरी आल्यानंतर आरोपीने तिला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन अनैसर्गिक कृत्य करत त्याचा व्हिडिओ तयार केला. याबाबत कोणाला सांगितले तर सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून बदनामी करू, अशी धमकी आरोपी मुख्तार खान उर्फ बब्बु यांनी दिली. त्यानंतर महिलेने सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
आरोपी फरार: महिलेने सिटी चौक पोलिसात रविवारी आपली तक्रार नोंदवली, रात्री उशिरा याप्रकरणी राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी असलेल्या मुख्तार खान उर्फ बब्बू याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याचा तपास सुरू करताच आरोपी पसार झाला. त्याच्या कार्यालयात गेले असता त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पाटी आढळून आली असून त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर मुख्तार खान नावाचा आमचा पदाधिकारी नाही. मात्र तो कार्यकर्ता असू शकतो, त्याच्याकडे कोणतेही पद दिले नसल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दिन यांनी सांगितले.
हे देखील वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.