संतापजनक: अल्पवयीन बहिणीच्या चारित्र्यावर संशय आल्याने संख्याभावाने चार दिवस केला तिच्यावर अत्याचार,अखेर तिच्या…….

Spread the love


उल्हासनगर : बहीण भावाच्या नात्याला कलंक लावणारी घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. एका भावाने आपल्या अल्पवयीन बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला बेदम मारहाण केली.सलग चार दिवस केलेल्या मारहाणीत मुलगी गंभीर जखमी झाली. यानंतर तिला रुग्णालायत नेण्यात आलं. मात्र, तोपर्यंत तिचा जीव गेला होता. या घटनेनंतर उल्हासनगर हादरलं आहे.

सर्वच स्तरातून या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. काय आहे प्रकरण? ब्रिजेश शुक्ला असे आरोपीचे नाव असून तो उल्हासनगर शहरात राहतो. आपल्या 12 वर्षीय बहिणीचे प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. याबाबत त्याने आपल्या बहिणीला विचारणा केली.

मात्र, पीडित मुलगी काहीही बोलत नव्हती. यावर संतापलेल्या आरोपीने तिला मारहाण सुरू केली. सलग चार दिवस तिला लाथा बुक्क्यांनी, स्टीलच्या पकडीने तोंडावर, पाठीवर आणि शरीराच्या इतर ठिकाणी बेदम मारहाण केली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.

पीडित मुलीच्या गुप्तांगातून रक्त येत होते. दरम्यान मारहाण केल्यानंतर त्याने तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तत्पूर्वी तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी ब्रिजेशला अटक केली
असून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार