भारतात जळगाव सर्वांत उष्ण

Spread the love

जळगाव :- जळगाव काही दिवसांपासून शहराच्या तापमानात कमालीची वाढ होत आहे. बुधवारी जळगाव शहरात ४४.६ अशी रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झाली. बुधवारी पूर्ण भारतात जळगाव शहर सर्वांत उष्ण ठरले. उष्ण शहरांमध्ये जळगाव शहर आठव्या क्रमांकावर होते. विदर्भातील बहुतांश शहरांचा पाराही चाळिशीपार होता. नाशकातही उच्चांकी ४०.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली.

मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी व वळवाच्या पावसामुळे तापमानात वाढ होऊ शकली नव्हती. मात्र, आता हवामान पूर्णपणे कोरडे झाले आहे. राजस्थानकडून उष्ण व कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याने सध्या जळगाव जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असल्याची माहिती स्कायवॉच संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

जगातील टॉप हॉट सिटी :

  • तीलबेरी (नायजर) : ४६.२

  • चौक (म्यानमार) : ४५.७

  • चौर (पाकिस्तान) : ४५.४

  • नवाब शाह (पाकिस्तान) : ४५

  • नद जामेना (चाड) : ४५

  • मातम (सेनेगल). : ४४.९

  • बिरनी एन काँनी (नायजर) : ४४.८

  • जळगाव (भारत) :. ४४.६

हे वाचलंत का ?

टीम झुंजार