जुनागड (गुजरात) : – लग्न झाल्यानंतर अनेक विवाहित स्त्री-पुरुषाची आपापल्या जोडीदाराकडून अनेक इच्छा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी अनेकांचा तसा प्रयत्नही असतो.पण गुजरातमधील जुनागड जिल्ह्यात एका नवविवाहित जोडप्याचे अनोखे प्रकरण समोर आलं आहे.
लग्न झाल्यानंतर अनेक विवाहित स्त्री-पुरुषाची आपापल्या जोडीदाराकडून अनेक इच्छा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी अनेकांचा तसा प्रयत्नही असतो. पण गुजरातमधील जुनागड जिल्ह्यात एका नवविवाहित जोडप्याचे अनोखे प्रकरण समोर आलं आहे. नवविवाहित महिलेने पती आपल्याशी शरीरसंबंध ठेवत नसल्याची तक्रार घेऊन पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
जुनागड जिल्ह्यातील हा प्रकार आहे. यामध्ये एका 23 वर्षीय विवाहितेचे फेब्रुवारी 2022 मध्ये पोरबंदरमध्ये लग्न झाले. लग्न चांगलं थाटामाटात झालं. पण लग्नानंतर केवळ दोन आठवड्यांनंतर वधूला कळले की तिच्या पतीला शारीरिक संबंधांमध्ये अजिबात रस नाही. पत्नीने आरोप केला आहे की, जेव्हाही तिने पतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिची निराशाच झाली. पतीने तिला कोणताही प्रतिसाद दिला नाही. नवविवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं की, ‘पतीने लग्न केले. मात्र, तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिला पत्नी होण्याचा अधिकार दिला नाही’.
सासरच्यांकडे तक्रार केल्यावर मिळाली धमकी
नवविवाहित महिलेने तक्रारीत लिहिले आहे की, तिने पतीच्या वागणुकीची माहिती सासरच्या मंडळींना दिली असता त्यांनी तिला समजून सांगण्याऐवजी तिला फटकारले. याची चर्चा कुठंही करू नकोस, असेही म्हटलं. जेव्हा तिने तिच्या आई-वडिलांना सांगितल्याचे पतीला हे समजले तेव्हा त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
हे देखील वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……