जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
परिस्थितीला नावे ठेऊ नका. आपल्या मानसिक अस्वास्थ्याचे कारण शोधा. एकाच गोष्टीवर अडकून राहू नका. आपल्या आवडत्या कामात मन गुंतवा. मित्रांशी मतभेद संभवतात.
वृषभ :-
व्यावहारिक बुद्धिमत्ता दाखवाल. तुमचा तर्क अचूक लागेल. आपले मत गोडीने समजावून सांगाल. कामाचा व्याप वाढेल. अती श्रमाचा ताण राहील.
मिथुन :-
हसतहसत कामे साधून घ्याल. तत्परतेने कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा. खोट्या गोष्टींचा आधार घेणे टाळा. आपले विचार मोजक्या शब्दात मांडा. झोपेची तक्रार जाणवेल.
कर्क :-
जोडीदाराची उत्तम साथ राहील. मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतील. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. फसवणुकीपासून सावध राहावे. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.
सिंह :-
कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. कामात हाताखालील सहकार्यांची मदत होईल. लहान मुलांत रमून जाल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न कराल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.
कन्या :-
इतरांवर आपली उत्तम छाप पाडाल. तब्येतीत सुधारणा दिसून येईल. फक्त कामावरच लक्ष केंद्रित करावे. मनाची चंचलता जाणवेल. वडीलधार्यांचा सल्ला विचारात घ्यावा.
तूळ :-
वादाच्या दोन्ही बाजू विचारात घ्याव्यात. एखाद्या इच्छेला मुरड घालावी लागू शकते. पत्नीचा निश्चय मान्य करावा लागेल. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. क्षुल्लक कारणांवरून चिडू नये.
वृश्चिक :-
जोडीदाराच्या मताला मान्यता द्याल. तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. घरात प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न कराल. कामात प्रगतीला वाव आहे. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ होईल.
धनू :-
कामे यथायोग्य पार पडतील. खर्चाचा योग्य आकडा निश्चित करावा. टीकेला सामोरे जावे लागू शकते. हट्ट सोडावा लागू शकतो. भावंडांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.
मकर :-
कामातील चिकाटी वाढवावी. उतावीळपणे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. चुकून बोललेला शब्द लागू शकतो. स्वभावात काहीसा लहरीपणा येईल. इतरांना आनंदाने मदत कराल.
कुंभ :-
आपले उद्दीष्ट सध्या करण्याचा प्रयत्न करावा. खाण्यापिण्याची पथ्य पाळावीत. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. स्वत:चेच म्हणणे खरे कराल. साहसी निर्णय विचारांती घ्यावेत.
मीन :-
सामाजिक वादात अडकू नका. वडीलधार्यांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. निसर्ग सौंदर्याची ओढ वाढीस लागेल. इतरांच्या मदतीला धावून जाल. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल.
हेही वाचलंत का ?
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






