पाय घसरून विहिरीत पडल्याने रवंजे ता.एरंडोल येथील तरूण शेतकऱ्याचा मृत्यू.

Spread the love

एरंडोल :- शेतातील विहिरीतून पाणी काढत असताना अचानक तोल जाऊन विहिरीत पडल्यामुळे 37 वर्षीय युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास रवंजे खुर्द तालुका एरंडोल येथे घडली
याबाबत माहिती अशी की रवंजे खुर्द येथील जितेंद्र गजमल पाटील वय 37 वर्षे हे आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास शेतातील विहिरीतून पाणी काढत होते.

पाणी काढत असताना यांचा तोल गेल्याने ते विहिरीत पडले जितेंद्र पाटील विहिरीत पडल्याचे समजताज विनोद अजबराव पाटील याने जितेंद्र चे चुलत भाऊ देविदास पाटील यांना कळवले देविदास पाटील, गजमल पाटील हे शेतातील विहिरीजवळ गेले पाटील व शेतात काम करीत असलेले मजूर यांनी जितेंद्र पाटील यास विहिरीतून बाहेर काढल्यावर ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे आणले. असता जितेंद्र पाटील यांची तपासणी केल्यानंतर ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत देविदास पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद त्यातून हवालदार जुबेर खाटीक पुढील तपास करीत आहे.

मयत जितेंद्र पाटील हा शेतीसह खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. त्याचे पश्चात आई ,वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व बहीण असा परिवार आहे.
जितेंद्र पाटील याचे शवविच्छेदन करून सायंकाळी रवंजे खुर्द येथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. घरातील कर्ता पुरुष गेल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
फोटो ओळ जितेंद्र पाटील.

हे पण वाचा

टीम झुंजार