छत्रपती संभाजीनगर : बाथरूममध्ये विवाहिता अंघोळ करत असताना एका तरुणाने खिडकीतून व्हिडिओ चित्रीकरण केले. मात्र, त्याच्या हातातून मोबाईल बाथरूममध्ये पडल्याने हा प्रकार उघडकीस आला.
घटना ९ मे रोजी पुंडलिकनगर पोलिस ठाणे हद्दीत घडली. घटना उघडकीस आल्यानंतर चित्रीकरण करणाऱ्या तरुणाच्या आईला कृत्यासंदर्भात सांगितले असता आईने फिर्यादीला शिवीगाळ केली. याप्रकरणी तरुणासह आईविरोधात पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
ऋतिक दीपक नाईक (२३) असे तरुणाचे तर रजनी दीपक नाईक असे त्या महिलेचे नाव आहे. यासंदर्भात ३२ वर्षीय तरुणीने पुंडलिकनगर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार ती दोन मुलांसह पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असून ती धुणी भांडी काम करते. नऊ मे रोजी ती राहत्या घरी बाथरूममध्ये अंघोळ करत असताना खिडकीतून मोबाईल बाथरूममध्ये तिच्यासमोर पडला. विशेष म्हणजे फिर्यादी विवाहिता बाथरुममधून बाहेर येईपर्यंत एक मुलगी तिथे आली आणि तिने माझ्या भावाचा मोबाईल तुमच्या बाथरूममध्ये पडला आहे असे म्हणाली. त्यावर विवाहितेने मोबाईल इथे कसा काय आला? तुझा भाऊ अंघोळ करत असतानाच चित्रीकरण करत होता असे म्हटली असता, संबंधित संशयित तरुण तिथे आला.
त्यावर विवाहितेने त्याला विचारणा केली असता, आपल्याला काही माहिती नाही असे म्हटला, तोवर त्याची बहिण मोबाईल घेऊन गेली. दरम्यान ऋतिक याने चित्रीकरण केल्याचे समजल्यानंतर फिर्यादीने ऋतिक याच्या आईला सांगितले असता, तीने शिवीगाळ केली. त्यानंतर सदर विवाहितेने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. यावरुन ऋतीकसह त्याच्या आईविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक संदीप काळे हे करत आहेत.
हे देखील वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.