चोरीची सिल्वर रंगाच्या चार चाकी आले होते चोरटे, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआर देखील नेला चोरून.
अमळनेर :- शहरातून पिंपळे रस्त्यावरून चारचाकी चोरून मुंदडा पार्क मधील दागिन्यांचे दुकान फोडून चार चोरट्यानी रोख रकमेसह कार व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना १३ रोजी पहाटे घडली.
मनीष प्रकाश सोनार यांचे सप्तशृंगी कॉलनीतील मानसी ज्वेलर्स व कॉस्मेटिक दुकान असून दुकानासमोरील शुभम खंबायत याने मनिषला पहाटे साडे तीन वाजता फोन आला की तुमच्या दुकानात सिल्वर रंगाच्या चार चाकी क्रमांक एम एच ०९ ए क्यू १५५९ मधून चार जण आले. दुकानाचे शटर चे कुलूप तोडून दुकानात चोरी करत असल्याचे मी पाहिले. आरोळ्या मारताच चोर पळून गेल्याचे सांगितले.
मनीष ने दुकानात येऊन पाहिले असता दुकानातील १ लाख २० हजार रूपयांचे ४१ ग्राम सोन्याचे दागिने ,सहा अंगठ्या , ५० हजार रुपयांचे दीड किलो चांदीचे दागिने व ५० हजार रुपये रोख आणि एक हजार रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्य असा २ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे निदर्शनास आले. मनीष याने रात्रीच पोलिसांना कळवले मात्र पोलीस येईपर्यंत चोरटे शहराबाहेर फरार झाले होते.
घटनास्थळी रात्रीच डी वाय एस पी राकेश जाधव ,पोलीस निरीक्षक विजय शिंदे ,पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांच्यासह पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. जळगाव येथून ठसे तज्ज्ञ मागवण्यात आले होते.
चोर सराईत डिव्हीआर देखील नेला
चोरटे सराईत असल्याचे दिसून आले. चोरी करताना त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील चोरून नेल्याने चोरटे सीसीटीव्ही मध्ये दिसणार नाहीत. आणि चोरटे ज्या चारचाकीतून आले ती देखील चोरट्यानी शहरातून पिंपळे रोडववरील समर्थ नगर मधून चोरली होती. दीपक गोपाल पाटील रा कोल्हापूर हा आईवडीलांकडे अमळनेर येथे आला होता. त्याची ७० हजार रुपये किमतीची चार चाकी क्रमांक एम एच ०९ ,ए क्यू १५५९ ही त्याच्या अंगणातून चोरून नेली. दीपक याच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरफोडीचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी तर कार चोरीचा तपास हेडकॉन्स्टेबल कैलास पवार करीत आहेत.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.