सासरच्यांकडून पैशांसाठी छळ,प्रेयसी सोबत अनैतिक संबंध याला कंटाळून गर्भवती प्राध्यापिकेने संपवले आयुष्य.

Spread the love

पतीच्या विरोधात माहेरच्यांकडून गुन्हा दाखल,तर दुसरा गुन्हा हा प्रेयसी कडूनही त्याच्या त्रासाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
छत्रपती संभाजीनगर :
शहरातील नामांकित एमआयटी महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या वर्षा दीपक नागलोत (वय २९ वर्षे) यांनी सासरच्यांकडून पैशांसाठी होत असलेला छळ व पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून आत्महत्या केल्याची बाब न्यायालयात समोर आले आहे. प्रा. वर्षा दीपक नागलोत यांनी ३ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणात त्यांचा पती दीपक तेव्हापासून अटकेत आहे. त्याने न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, वर्षा यांच्या माहेरच्यांकडून घेतलेल्या पैशांचे पुरावे, विवाहबाह्य संबंध व त्या प्रेयसीला दिलेला छळाची गंभीर दखल घेत न्यायालयाने गुन्ह्यात दोषारापपत्र दाखल झाल्यानंतरही दीपकचा जामीन नाकारला.

आत्महत्या केली तेव्हा वर्षा सात महिन्याच्या गर्भवती होत्या.त्यांच्या आत्महत्येप्रकरणी पती दीपक नागलोत (वय ३२ वर्षे) सह सासरा राजाराम नागलोत (वय ६० वर्षे), सासू देविका (वय ५५ वर्षे), नणंद वैशाली (वय २५ वर्षे, सर्व रा. गजानन कॉलनी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रेमविवाह करूनही दीपक व त्याच्या वडिलांनी वर्षा यांच्या माहेरच्यांना सातत्याने पैशांची मागणी करत लाखो रुपये घेतले. त्यानंतरही दीपकचे विवाहबाह्य संबंध सुरू झाले. त्यातून त्याने पत्नी वर्षा यांचा छळ सुरू केला होता.
व्हॉटसअॅप चॅटिंगमधून दीपकची विकृती स्पष्ट
वर्षा यांच्या आत्महत्येच्या दिवशी दीपकला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी तपास पूर्ण करुन दोषारोपपत्र देखील दाखल केले.

अटकेपासून तो जामिनासाठी प्रयत्न करत आहे. वर्षा यांच्या माहेरच्यांच्या बाजूने ॲड. प्रशांत नागरगोजे, विष्णू नरके यांनी बाजू मांडत दीपकच्या जामिनाला विरोध केला. पैसे घेतल्याच्या पुराव्यांसह त्याच्या प्रेयसी सोबतचा संवादाचे सबळ पुरावेच ॲड. प्रशांत नागरगोजे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत त्याच्या छळाचा पाढाच वाचला. त्यानंतर सत्र न्यायाधीश न्या. वर्षा पारगावकर यांनी दीपकचा जामीन अर्ज फेटाळून लावला. विशेष म्हणजे, अर्जदारासारखी व्यक्ती समाजासाठी धोकेदायक आहे, अशी गंभीर टिप्पणीदेखील न्यायालयाने केली.

माहेरच्यांकडून घेतलेले पैसे हुंडा म्हणूनच ग्राह्य
न्यायालयाने जामीन नाकारताना आरोपी पक्ष माहेरच्यांकडून आरोपींच्या खात्यावर आलेले लाखो रुपये का घेतले हे सांगण्यात कमी पडला. त्यामुळे हे पैसे हुंडा म्हणूनच ग्राह्य धरल्याचे ॲड. नागरगोजे यांनी सांगितले. आरोपींनी सातत्याने साक्षीदारांवर दबाव टाकला. त्यात दोन स्वतंत्र दोन गुन्हे दाखल झाले. त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली. प्रेयसीने देखील त्याच्या त्रासाविरोधाात चिकलठाणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्याची देखील न्यायालयाने दखल घेतली.

हे पण वाचा

टीम झुंजार