दंगलीत वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ, शहरात कलम १४४ लागू.आतापर्यंत 15 जणांवर गुन्हे दाखल
अकोला :- शहरातील हरिहरपेठमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादाचं पर्यावसान दंगलीत झालं. या दंगलीमुळे उसळेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला असून दहाहून अधिक जण जखमी आहे.तसेच या राड्यात वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला असून कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. सोशल मीडियावरील पोस्टवरुन या वाद झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
अकोल्यात एका तरुणानं फेसबुकवर केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. त्यानंतर पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करत असतानाच एक मोठा जमाव हरिहरपेठ भागातील राजराजेश्वर सेतू येथे रस्त्यावर उतरला आणि त्यांनी उच्छाद मांडण्यास सुरुवात केली. वाहनांची तोडफोड करत जाळपोळ सुरू केली.तसेच काही घरंही पेटवण्याचा प्रयत्न जमावाकडून करण्यात आला. या दंगलीत दोन्ही गटातील एकूण 10 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शहरात कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परिस्थिती सध्या नियंत्रणात असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
दंगल घडण्यामागचं कारण काय?.
अकोल्यात एका तरुणानं फेसबुकवर केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. त्यानंतर पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करत असतानाच एक मोठा जमाव हरिहरपेठ भागातील राजराजेश्वर सेतू येथे रस्त्यावर उतरला आणि त्यांनी उच्छाद मांडण्यास सुरुवात केली. वाहनांची तोडफोड करत जाळपोळ सुरू केली. तसेच काही घरंही पेटवण्याचा प्रयत्न जमावाकडून करण्यात आला.
कलम १४४ लागू …
अकोला शहरातील दोन गटात वाद प्रकरणी हरिहर पेठ परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणात असून शांतता राखण्याचं आवाहन वारंवार पोलिसांकडून नागरिकांना केलं जात आहे. तणावाच्या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणी आतापर्यंत 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय वाशिममधून अतिरिक्त कुमकही मागवण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अकोल्याचे पालकमंत्रीही आहेत. सध्या हरिहरपेठ आणि इतर संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या संपूर्ण शहरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अकोल्यात या घटनेच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गुन्हा दाखल…
अकोला दंगलीत वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ, शहरात कलम १४४ लागू.आतापर्यंत 15 जणांवर गुन्हे दाखल) शहरातील दोन गटात वाद प्रकरणी हरिहर पेठ परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणात असून शांतता राखण्याचं आवाहन वारंवार पोलिसांकडून नागरिकांना केलं जात आहे. तणावाच्या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणी आतापर्यंत 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय वाशिममधून अतिरिक्त कुमकही मागवण्यात आली आहे.
हे पण वाचा
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.
- धुमधडाक्यात आली वरात, डी जे वाजवण्यावरून झाला वाद, लग्नाचा आनंद क्षणात दुःखाच्या सागरात बुडाला, लग्नात असं काय घडलं?